आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅक्शन:ब्राह्मण समाजाच्या विरोधानंतर 'पोगारू' या कन्नड चित्रपटातील 14 वादग्रस्त दृश्ये वगळली, निर्मात्यांची ग्वाही -  यामुळे चित्रपटावर परिणाम होणार नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या काळात प्रदर्शित झाला बिग बजेट कन्नड चित्रपट

ब्राह्मण समुदायाच्या विरोधानंतर ध्रुव सरजा आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पोगारू' या कन्नड चित्रपटातून वादग्रस्त दृश्ये वगळण्यात आली आहेत. रिपोर्ट्सनुसार, कर्नाटक ब्राह्मण विकास मंडळ आणि कर्नाटक फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. या दृश्यांद्वारे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप या चित्रपटाच्या निर्मात्यांवर करण्यात आला होता.

कोरोनाच्या काळात प्रदर्शित झाला बिग बजेट कन्नड चित्रपट
कोरोनाच्या काळात 19 फेब्रुवारी रोजी पोगारु हा पहिला बिग बजेट कन्नड चित्रपट रिलीज झाला होता. ब्राह्मण समाजाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला आहे. चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांवर आक्षेप घेत ब्राह्मण समाजाकडून सातत्याने चित्रपटाचा विरोध केला जात होता. बुधवारी कर्नाटक फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जयराज यांनी माध्यमांना सांगितले की, निर्मात्यांनी चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये वगळण्यासाठी सहमती दर्शविली आहे.

चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये कोणती?
चित्रपटातील एका दृश्यात होमहवन करत असलेल्या ब्राह्मणांसोबत गुंडे गैरवर्तन करताना दाखवण्यात आले होते. दुसर्‍या दृश्यात गुंड ब्राह्मणांच्या खांद्यावर पाय ठेवले आहेत. बाकीची आणखी काही दृश्ये अशाप्रकारे वादग्रस्त आहेत. वादग्रस्त दृश्ये हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक नंदकिशोर यांनी माफी मागताना म्हटले की, कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. ही दृश्ये वगळल्यानंतर चित्रपटावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी प्रेक्षकांना दिली.

भाजपने केली होती स्क्रिनिंग बंद करण्याची मागणी

मंगळवारी कर्नाटकमधील भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाला विरोध दर्शवत लिहिले होते की, हिंदूंचा अपमान करणे आणि लोकांच्या भावना दुखावणे ही आता एक फॅशन झाली आहे. अशा प्रकारचे अन्य धर्माचा अपमान करण्याची त्यांच्यात हिंमत आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. इतकेच नाही तर जोपर्यंत चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळली जात नाही, तोपर्यंत चित्रपटाचे स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी त्यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...