आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ब्लॅक' चित्रपटाच्या रिलीजला 16 वर्षे पूर्ण:राणी म्हणाली - 'ब्लॅक' मधील माझा अभिनय पाहून दिलीप कुमार साहेबांनी मला पत्र लिहिले होते

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ब्लॅक' या चित्रपटात राणीने मिशेलची व्यक्तिरेखा साकारली होती.

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाला गुरुवारी 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 4 फेब्रुवारी 2005 रोजी प्रदर्शित झाला होता. यानिमित्ताने राणी म्हणाली, "ब्लॅक' मास्टर पीस होता, यात दुमत नाही. संजय लीला भन्साळी यांनी मला जेव्हा या भूमिकेची ऑफर दिली तेव्हा या चित्रपटात काम करण्याविषयी माझे मत स्पष्ट नव्हते. मला या चित्रपटाविषयी किंवा व्यक्तिरेखेबद्दल शंका होती, असे नाही. भन्साळींसोबत काम करणे कोणत्याही कलाकाराचे एक स्वप्नच असते," असे राणीने सांगितले.

ती पुढे म्हणाली, "या चित्रपटासाठी मला सहा महिने खरोखर कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले होते आणि सांकेतिक भाषाही शिकावी लागली होती. या संपूर्ण काळात मी दिव्यांग लोकांशी सांकेतिक भाषेत संवाद साधत होते आणि अशाप्रकारे मी मिशेलची व्यक्तिरेखा साकारु शकले."

दिलीप कुमार यांनी चित्रपटातील माझ्या कामाचे कौतुक केले होते
राणी म्हणाली, "हा चित्रपट पाहिल्यानंतर दिलीप कुमार यांनी माझ्या कामाचे आणि माझे कौतुक करणारे एक पत्र लिहिले होते. अभिनेत्री म्हणून दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याकडून कौतुकाची थाप मिळणे, ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणूनच या महान अभिनेत्याकडून मिळालेली शाबासकीची थाप आणि आशीर्वाद माझ्यासाठी एखाद्या सन्मानापेक्षा कमी नाही."

राणीने पुढे सांगितले, "माझ्या वडिलांनी त्यांच्याबरोबर काम केले होते, त्यामुळे त्यांचे काम आणि त्यांच्या प्रोफेशनॅलिज्मचे अनेक किस्से ऐकत मी मोठे झाले आहे. लहानपणापासूनच मी त्यांची मोठी चाहती आहे. त्यांनी लिहिले पत्र ही एक अशी गोष्ट आहे जी मला कायम लक्षात राहील," असे राणी म्हणाली.

बातम्या आणखी आहेत...