आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलीजची सुरुवात:चीनमध्ये थिएटर सुरु झाल्यानंतर रिलीज होणारे पहिले चित्रपट असू शकतील '1917' आणि 'लिटल वूमन' 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना विषाणूमुळे यावर्षी चीन बॉक्स ऑफिसला 4.2 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
  • चीनमध्ये रिलीज होणा-या इतर चित्रपटांमध्ये मॅरेज स्टोरी, जोजो रॅबिट, फोर्ड वर्सेस फरारी यांचा समावेश आहे.

सॅम मेंडिसचा वॉर ड्रामा '1917' आणि ग्रेटा गेरविंगचा 'लिटल वूमन' हे दोन चित्रपट चीनमधील थिएटर सुरु झाल्यानंतर प्रदर्शित होणारे पहिले चित्रपट असू शकतील. दोन्ही चित्रपटांना चीनमध्ये सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले असून ऑस्कर पुरस्कारानंतर लगेच फेब्रुवारीमध्ये ते प्रदर्शित होणार होते. मात्र कोरोनाव्हायरसमुळे हे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नव्हते. 

वेरायटी डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी अद्याप कोणतीही नवीन प्रदर्शनाची तारीख निश्चित केलेली नाही, परंतु दोन्ही चित्रपटांचे नवीन पोस्टर रिलीज झाले आहेत. चीनी प्रशासनाने शुक्रवारी सांगितले की, करमणुकीची ठिकाणे पुन्हा उघडली जाऊ शकतात. तथापि, या ठिकाणांच्या मॅनेजमेंटला जमलेली गर्दी नियंत्रणात ठेवावी लागेल आणि प्री बुकिंगची पद्धती अवलंबवावी लागेल. सुत्राच्या माहितीनुसार, 5 जून रोजी चीनमध्ये सिनेमा हॉल पुन्हा सुरू करता येतील. मात्र अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.

या चित्रपटांचे नवीन पोस्टर्स आणि प्रमोशनल मटेरियलवरुन चीनमधील दैनंदिन जीवन सामान्य झाल्यानंतर हे चित्रपट प्रदर्शित केले जातील, असा अंदाज वर्तवला जातोय. 1917 च्या पोस्टरमध्ये दोन सैनिक फुलांनी बहरलेले चेरीच्या झाडांसोबत दिसत आहेत. त्याच्या टॅगलाइनमध्ये लिहिले आहे - सिनेमासोबत डेट करा, अगदी पुर्वी करायचे तसे...

फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डेनिमित्त चीनमध्ये 'लिटिल वूमन'सुद्धा प्रदर्शित होणार होता. आता त्याच्या पोस्टरच्या टॅगलाइनमध्ये लिहिले आहे - प्रेम आणि स्वातंत्र्य विसरू नका. मोठ्या पडद्यावर, आमच्याबरोबर रहा.

ऑनलाईन तिकीट प्लॅटफॉर्म माओयानवरही लिटिल वूमनची जाहिरात केली जात आहे. प्रेम आणि आनंदासाठी नेहमीच प्रतिक्षा केली जाऊ शकते, सिनेमा स्क्रिन्स तयार आहेत आणि तुमची वाट पाहात आहेत, या टॅगलाइनसह या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. 

1917 मध्ये जॉर्ज मॅके, डीन चार्ल्स चॅपमॅन सैनिकांच्या भूमिकांत आहेत. कथेनुसार या लोकांना शत्रूच्या हद्दीत संदेश पाठविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जर या लोकांनी हा संदेश दिला तर 1600 ब्रिटिश सैनिकांचे प्राण वाचतील.

बातम्या आणखी आहेत...