आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेटफ्लिक्सची ओरिजिनल सिरिज 'द चोझन वन'ची संपूर्ण टीम रस्ता अपघातात गंभीर जखमी झाली आहे. इतकेच नाही तर हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात मालिकेतील दोन कलाकारांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहेत. या मालिकेचे शूटिंग काही काळ थांबले आहे. रॅमुंडो गार्डुनो क्रूझ आणि जुआन फ्रान्सिस्को गोन्झालेझ अशी अपघातात ठार झालेल्या कलाकारांची नावे आहेत.
16 जून रोजी हा अपघात झाला होता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिरिजची निर्मिती कंपनी रेड्रमने या मालिकेचे चित्रीकरण थांबवले आहे. या घटनेबाबत नेटफ्लिक्सने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. 16 जून रोजी स्थानिक विमानतळाकडे जात असताना वाळवंटी रस्त्यावर हा अपघात झाला. अपघातावेळी ही व्हॅन सुसाट वेगाने जात होती, ती अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली आणि हा अपघात घडला.
सिरिजच्या 2 कलाकारांचा मृत्यू
बाजा कॅलिफोर्नियाच्या सांस्कृतिक विभागाने शुक्रवारी सांगितले की, अभिनेते रॅमुंडो गार्डुनो क्रूझ आणि जुआन फ्रान्सिस्को गोन्झालेझ यांचा मृत्यू झाला असून सहा सदस्य जखमी झाले आहेत. जखमी कलाकारांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
'अमेरिकन जीझस' या कॉमिक बुकवर आधारित आहे सिरिज
'द चोझन वन' ही ब्राझिलियन थ्रिलर मालिका आहे, ज्याचा पहिला सीझन 2019 मध्ये लाँच झाला होता. ही मालिका 'अमेरिकन जीझस' या कॉमिक बुकवर आधारित आहे. 'द चोझन वन' या सिरिजमध्ये, "एका 12 वर्षाच्या मुलाला समजले की तो परत आलेला येशू ख्रिस्त आहे, ज्याला मानवजातीला वाचवायचे आहे. हे मार्क मिलर आणि पीटर ग्रॉस यांचे कॉमिक बुक आहे. ही सिरिज यावर आधारित आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.