आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

एनसीबीचे 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह:दीपिका, श्रद्धा आणि सारा यांनाही चाचणी करण्यास सांगण्यात आले; अहमदाबाद, इंदूर आणि चेन्नई येथून अतिरिक्त टीम बोलावण्यात आली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिकाचे हे छायाचित्र एनसीबी गेस्ट हाऊस येथील आहे. शनिवारी चौकशीसाठी दीपिका येथे दाखल झाली होती. तिलादेखील कोरोना चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे.
  • यापूर्वी एनसीबीच्या चार कर्मचा-यांना आणि एका ड्रग पेडलरलाही कोरोना संक्रमण झाले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करणा-या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) च्या 20 अधिकारी आणि कर्मचा-यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर एनसीबीची अतिरिक्त टीम मुंबईत बोलावण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबाद, इंदूर, बेंगळुरू आणि चेन्नई येथील अधिका-यांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह असणा-यांमध्ये बरेच मोठे अधिकारीही आहेत. गेस्ट हाऊसमध्ये मुंबईबाहेरील अधिका-यांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे.

एनसीबीच्या सूत्रानुसार, गेल्या एका आठवड्यात ज्या लोकांची टीमने चौकशी केली किंवा ज्यांना ते भेटले, त्या सर्वांना कोविड टेस्ट करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांचा समावेश आहे. आज किंवा उद्या सर्वजण कोरोना चाचणी करु शकतात. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी बहुतेकांना लक्षणे नसल्याचे सांगितले जात आहे.

  • एनसीबीच्या दोन टीम ड्रग्ज प्रकरणी चौकशी करत आहेत

यापूर्वी, एक्सचेंज बिल्डिंगमधील एनसीबी कार्यालयातील चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले, तेव्हा संपूर्ण कार्यालय काही दिवस बंद होते. एनसीबीच्या दोन टीम बॉलिवूडमध्ये ड्रग्ज अँगलचा शोध घेत आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित ड्रग्स अँगलची चौकशी एनसीबी कार्यालयात सुरू होती आणि गेट वे ऑफ इंडियाजवळील गेस्ट हाऊसमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्ज अँगलची चौकशी केली जात आहे.