आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर गदर : एक प्रेमकथा या चित्रपटाच्या रिलीजला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा 2001 मधील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
'गदर' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले, 'त्या काळात काश्मिरी पंडिताचे प्रकरण सुरू होते. माझ्या डोक्यात काश्मीरमधील एक मुलगा आणि पाकिस्तानमधील एका मुलीवर चित्रपट बनवण्याचा विचार सुरू होता. या कथेसाठी दिलीप साहेब आणि धरमजी यांनीदेखील संमती दिली होती. दरम्यान, लेखक शक्तिमानजी यांनी मला एक खरी कहाणी ऐकवली. त्याची प्रेरणा घेत मी त्यावर चित्रपट करण्याचा विचार केला आणि मी माझी कल्पना सोडली. नंतर या चित्रपटावर काम करण्यास सुरवात केली. अशा प्रकारे ‘गदर’ची सुरुवात झाली.'
अनिल शर्मा पुढे सांगतात, 'त्यानंतर मी अमरीश पुरी यांना कथा ऐकवली तर त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी पटकन होकार दिला. सकीनाच्या भूमिकेसाठी आम्ही इंडस्ट्रीतील मोठ्या अभिनेत्रींना विचारणा केली होती, मात्र सर्वांनीच नकार दिला होता. त्यानंतर आम्ही 400 नव्या आणि मॉडेल्सचे ऑडिशन घेतले त्यात अमिषा पटेलची निवड झाली.'
लखनऊमध्ये उभारला होता पाकिस्तानचा सेट
शर्मा पुढे सांगतात, 'चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यात सव्वा वर्ष लागले कारण, सनी देओल प्रत्येक शेड्यूलनंतर दाढी वाढवण्यासाठी दोन महिन्यांचा ब्रेक घेत असत. त्या ब्रेकमध्ये ते क्लीन शेव्ह होऊन
दुसऱ्या चित्रपटाची शूटिंग करत होते. याव्यतिरिक्त आम्ही लखनऊमध्ये पाकिस्तानचा सेट उभारला होता. आम्हाला फाळणीच्या काळातील स्टीम इंजिन दाखवायचे होते, तेदेखील मोठ्या मुश्किलीने
सापडले होते.'
हँडपंप काढण्याच्या मागे हीरोच्या भावना होत्या
शर्मा पुढे सांगतात, 'हँडपंप काढण्याच्या दृश्याला लोक आजही खरं मानत नाहीत. मात्र सर्वात जास्त टाळ्या त्याच दृश्यावर पडल्या होत्या. पत्नी आणि मुलाच्या प्रेमातून तो हीरो तसं करतो. हजारो
लोकांच्या गर्दीत हीरोने जेव्हा हँडपंप काढला तेव्हा पडद्यावर जादू झाली.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.