आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून फिल्म इंडस्ट्री पूर्ण ठप्प झाली आहे. चित्रपटगृहांमध्ये शेवटचे रिलीज झालेले चित्रपट 'कामयाब' आणि 'अंग्रेजी मीडियम' हे आहेत. तर बमफाड, घुमकेतू, गुलाबो-सीताबो हे चित्रपट थिएटरऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येत आहेत. यामुळे चित्रपटगृहे आणि चित्रपट वितरकांचे बरेच नुकसान झाले आहे.
इंडस्ट्रीशी संबंधित सर्व लोक लॉकडाऊनमुळे बंद झालेली चित्रपटगृहे उघडण्याची वाट पहात आहेत. अमिताभ-आमिरसह अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट रांगेत असून रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. व्यापार विश्लेषक अतुल मोहन म्हणतात की, एका अंदाजानुसार चित्रपटगृहांचे मालक आणि चित्रपट वितरकांना दर आठवड्याला सुमारे 55 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. म्हणजेच दर महिन्याला 200 कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत जवळपास हजार कोटींचे नुकसान
व्यापार पंडित राज बन्सल म्हणतात की, 'इंडस्ट्रीतील नुकसानाबद्दल बोलायचे म्हणजे, सर्वात जास्त नुकसान चित्रपटगृहांच्या मालकांचे झाले आहे. जुलैपर्यंत चित्रपटगृहे बंद राहिल्यास 15 आठवड्यांत त्यांचे 750 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. जुलैनंतर जर सणांच्या काळातदेखील चित्रपटगृहे बंद राहिल्यास निर्मात्यांना मोठा फटका बसेल.” चित्रपट समीक्षक तरण आदर्श म्हणतात की, लॉकडाऊनमुळे मार्चपासून या उद्योगाला एक हजार कोटींचा तोटा झाला आहे.
मधला मार्ग शोधावा लागेल
या संदर्भात निर्माता कबीर खान म्हणतात की, निर्माते थिएटरची चिंता करत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटगृहांच्या मालकांनीही निर्मात्यांची चिंता करायला हवी. मधला एक मार्ग शोधला पाहिजे, ज्याद्वारे निर्माते देखील आत्मविश्वासाने चित्रपट चित्रपटगृहात लावू शकतील आणि खर्च काढू शकतील. सूर्यवंशी, 83 आणि आमिर खानचा बहुप्रतिक्षित लाल सिंग चड्ढासह 12 असे मोठे चित्रपट आहेत, जे चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर रिलीज झाल्यास मोठा नफा मिळू शकेल.
आता सोलो रिलीज मिळणे कठीण आहे
फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊन नसते तर बहुतांश बिग बजेट चित्रपटांना सोलो रिलीज मिळणार होती. पण आता येत्या काही महिन्यांत चित्रपटांची गर्दी जमणार आहे. आता प्रत्येकी एका तारखेला दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ते एकमेकांचा व्यवसाय कमी करतील. दिग्दर्शक करण मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार, “एखाद्या चित्रपटाला सोलो रिलीज मिळाला नाही तर तो डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सॅटेलाइट राइट्सपेक्षाही कमी पैसे मिळतात.''
हे चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत
चित्रपट | अभिनेता |
लालसिंग चड्ढा | आमिर खान |
83 | रणवीर सिंग |
सूर्यवंशी | अक्षय कुमार |
सडक -2 | संजय दत्त |
चेहरे | अमिताभ बच्चन |
शमशेरा | रणबीर कपूर |
भुज | अजय देवगण |
जर्सी | शाहिद कपूर |
गंगूबाई काठियावाडी | आलिया भट्ट |
जयेश भाई जोरदार | रणवीर सिंग |
पृथ्वीराज चौहान | अक्षय कुमार |
ब्रह्मास्त्र | अमिताभ बच्चन |
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.