आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक किस्से:अमिताभ-आमिरने फ्लॉप म्हणून नाकारला होता चित्रपट, जावेद अख्तर यांनी दिला होता चित्रपट न बनवण्याचा सल्ला

12 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 'लगान' हा पहिला भारतीय चित्रपट होता, जो चीनमध्ये रिलीज झाला होता. याचा प्रीमियर शंघाईमध्ये झाला होता.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' या चित्रपटाला 15 जून रोजी 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात आमिर खान, ग्रेसी सिंग मुख्य भूमिकेत होते. 'मदर इंडिया' आणि 'सलाम बॉम्बे'नंतर अकादमी पुरस्कारासाठी पाठवलेला हा भारतातील तिसरा चित्रपट होता. वास्तविक हा चित्रपट 1957 मध्ये आलेल्या बीआर चोप्रा दिग्दर्शित 'नया दौर' या चित्रपटापासून प्रेरित आहे. 'लगान' चित्रपटाने कल्ट क्लासिकचा दर्जा प्राप्त केला, पण एकेकाळी तो बनवणे अशक्य होते.

आमिर खान आणि अमिताभ बच्चन सारख्या स्टार्सचा हा चित्रपट फ्लॉप ठरेल असा अंदाज होता आणि त्यामुळे त्यांनी चित्रपटाला नकार दिला. पण आशुतोष गोवारीकर यांनी हार मानली नाही आणि हा चित्रपट बनवला. नुकतीच या चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊया चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी-

आमिर खानने नाकारला होता चित्रपट
लगान हा आमिर खानच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो, पण प्रत्यक्षात आमिरला हा चित्रपट करायचा नव्हता. आशुतोष यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन पहिल्यांदा आमिरशी संपर्क साधला तेव्हा देशातील लोकांना क्रिकेटवर बनलेला चित्रपट पाहायचा नाही, असे म्हणत त्याने चित्रपट नाकारला. 5 मिनिटे स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आमिर थांबला आणि म्हणाला, ही कथा खूप विचित्र आहे, मला दुसरी कथा द्या.

आशुतोष हट्टामुळे पुन्हा स्क्रिप्ट घेऊन आमिरकडे पोहोचले

आशुतोष यांना आमिरला चित्रपटात कास्ट करायचे होते. आमिरच्या नकारानंतरही त्यांनी हार मानली नाही आणि पूर्ण स्क्रिप्ट घेऊन तीन महिन्यांनी पुन्हा ते आमिरकडे पोहोचले. यावेळी आमिर त्यांना चिडवत म्हणाला, तू अजूनही त्याच स्क्रिप्टवर काम करत आहेस. आशुतोष यांनी हट्ट धरल्यानंतर आमिरने स्क्रिप्ट ऐकली. यावेळी कथा वाचून आमिर भावूक झाला, पण तरीही चित्रपट हिट होण्याची शक्यता नसल्याचे सांगत त्याने नकार दिला.

स्क्रिप्टमध्ये बदल करून आशुतोष रोज आमिरकडे जात असत. एके दिवशी आमिरने त्याच्या आईळा स्क्रिप्ट ऐकवण्यास सांगितले. आशुतोष यांनी होकार दिला. आमिरच्या पालकांनी हा चित्रपट ऐकला तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. पालकांच्या सांगण्यावरून आमिरने या चित्रपटासाठी होकार दिला.

कोणताही निर्माता चित्रपट बनवायला तयार नव्हता

आशुतोष यांना लगान चित्रपटासाठी एका निर्मात्याची गरज होती, पण प्रत्येक निर्मात्याने नकार दिला. काहींनी चित्रपटाचे बजेट आणखी 25 कोटींनी कमी करावे अशी अट ठेवली होती. कोणीही पैसे गुंतवण्यासाठी तयार न झाल्याने आमिर खानने आशुतोषला मदत करून चित्रपटाची निर्मिती केली. यासाठी आमिर खानने आमिर खान फिल्म्स या नावाने निर्मिती कंपनी सुरू केली.

आमिरपूर्वी या कलाकारांनी नाकारला होता चित्रपट नाकारला
सुरुवातीला आशुतोष यांना शाहरुख खान, बॉबी देओल, हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन यांच्यापैकी एकाला भुवनच्या भूमिकेत कास्ट करायचे होते, परंतु सर्वांनी चित्रपट नाकारला. ग्रेसी सिंगच्या आधी राणी मुखर्जी, सोनाली बेंद्रे, नंदिता दास, शमिता शेट्टी आणि अमिषा पटेल यांना हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता.

जावेद अख्तर यांनी चित्रपट न करण्याचा दिला होता सल्ला
आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी जावेद अख्तर यांच्याकडे संपर्क साधला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, चित्रपट चालणार नाही. त्यांनी आशुतोष आणि आमिर यांना हा फ्लॉप चित्रपट बनवू नका असा सल्लाही दिला होता. अखेर हा चित्रपट तयार झाला, त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे.

अमिताभ बच्चन यांनी अंधश्रद्धेपोटी चित्रपट करण्यास दिला होता नकार
चित्रपटातील कथा सांगण्यासाठी अमिताभ यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यामचा आवाज चित्रपटात वापरायचा होता, पण त्यांनी यासाठी नकार दिला. अमिताभ यांनी आमिरला सांगितले होते की, त्यांनी व्हॉईस ओव्हर केलेले सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. आमिर त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने बिग बींनीही होकार दिला. शेवटी त्यांनी हो म्हटले आणि त्यांची ही अंधश्रद्धा चुकीची सिद्ध झाली.

याही आहेत चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी-

 • या चित्रपटाने 8 राष्ट्रीय पुरस्कार, 8 फिल्मफेअर पुरस्कार, 8 स्क्रीन पुरस्कार आणि 10 आयफा पुरस्कार जिंकले होते.
 • आमिरच्या व्हॉट्सअॅपवर 'लगान 11' नावाचा एक ग्रुप आहे, ज्यामध्ये अजूनही चित्रपटाशी संबंधित लोक आहेत.
 • चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संपूर्ण टीम 6 महिने बसमध्ये गायत्री मंत्र ऐकत जायची.
 • एका चित्रपटात सर्वाधिक ब्रिटिश कलाकारांना कास्ट करण्याचा विक्रम लगानच्या नावावर आहे.
 • भुवनच्या पात्रासाठी रंग सावळा करण्यासाठी आमिर अनेक तास उन्हात बसायचा.
 • शूटिंगदरम्यानच सिंक साउंड रेकॉर्डिंग म्हणजेच संवाद आणि आवाज रेकॉर्ड करणारा लगान हा पहिला भारतीय चित्रपट आहे.
 • चित्रपटाचे शूटिंग जानेवारी ते जूनपर्यंत चालले होते. दरम्यान, टीमने हिवाळ्यानंतर 50 डिग्री तापमानातही शूटिंग केले.
 • सरदारच्या भूमिकेसाठी मुकेश ऋषी यांना घ्यायचे होते. मात्र नंतर ही भूमिका प्रदीप रावत यांना दिली गेली. प्रदीप यांनी नंतर गजनीमध्ये सुद्धा आमिरसोबक काम केले होते.
 • शूटिंगदरम्यान लगानची टीम ज्या घरात थांबली होती, ते गुजरातच्या 2001 मध्ये आलेल्या भूकंपात जमीनदोस्त झाले होते.
 • 'लगान' हा पहिला भारतीय चित्रपट होता, जो चीनमध्ये रिलीज झाला होता. याचा प्रीमियर शंघाईमध्ये झाला होता.
 • 'गांधी' चित्रपटासाठी ऑस्कर जिंकणा-या भानू अथैय्या यांनी लगानसाठी कॉश्च्युम डिझाइन केले होते.
 • शूटिंगच्या फावल्या वेळेत एक सामना ब्रिटिश अभिनेते आणि भारतीय अभिनेत्यांमध्ये रंगला होता. त्यात ब्रिटिशर्सनी भारतीयांचा सहज पराभव केला होता.
 • 'लगान'च्या शूटिंगदरम्यान भूजमध्ये चांगले हॉटेल नव्हते. तेव्हा आमिर खानने एका कंस्ट्रक्डेट बिल्डिंगला हॉटेलमध्ये रुपांतरित केले होते.
 • ब्रिटिश कलाकारांसाठी इंग्लिश लिरिक्स आणि संवाद स्वतः आशुतोष गोवारिकर यांनी लिहिले होते.
 • अनेक पुरस्कार पटकावणारा लगान ऑस्कर फेस्टिव्हलमध्ये विदेशी भाषेच्या सर्वोत्कृष्ट श्रेणीत नामांकित झाला होता. मात्र नंतर हा पुरस्कार नो मेन्स लँडला मिळाला होता.
बातम्या आणखी आहेत...