आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी जोडपे:22 वर्षांत 22 अभिनेते- अभिनेत्री विवाहबंधनात ; ‘ब्रह्मास्त्र’ 300 कोटी क्लबमध्ये

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे ४१० कोटी रुपयांत तयार बॉलीवूडचा सर्वात महागडा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ ३०० कोटी क्लबमध्ये दाखल झाला आहे. यासोबतच रणवीर आणि आलिया मोठ्या पडद्यावर सर्वात यशस्वी जोडपे ठरले. २००० नंतर गेल्या २२ वर्षांत २२ अभिनेता व अभिनेत्रींनी वास्तव जीवनात विवाह केला आहे. यातील ११ जोडप्यांपैकी ५ जोडप्यांनी एकत्र काम केले आहे. या ५ पैकी ३ चित्रपट यशस्वी ठरले, तर २ पडले. या २२ जणांचे विवाहानंतर एकूण २२० चित्रपट आले. त्यापैकी ९४ म्हणजे ४३ टक्के यशस्वी ठरले. यापैकी ८ तर ब्लॉकबस्टर, १८ सुपरहिट, ४० हिट, २८ चित्रपट सरासरी, तर १२६ पूर्ण फ्लॉप ठरले. २२० पैकी ८८ चित्रपट तर एकट्या अक्षयने केले आहेत. यात ३ ब्लॉकबस्टर, ११ सुपरहिट, २४ हिट, १२ सरासरी, तर ३८ फ्लॉप ठरले. करिना सर्वात यशस्वी, ऐश्वर्या-दीपिका पिछाडीवर : करिनाचे ११ पैकी ७ चित्रपट गाजले. ऐश्वर्याचे ८ पैकी दोनच चित्रपट चालले. सर्वाधिक २३ पैकी २२ फ्लॉप रणवीर शौरीच्या नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...