आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुछ कुछ होता है'ला 22 वर्षे पूर्ण:चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काजोलने शेअर केले खास कार्टुन, वाचा चित्रपटाशी संबंधित खास पडद्यामागच्या गोष्टी

मुंबई2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • या चित्रपटाच्या रिलीजला 22 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री काजोल हिने खास कार्टुन शेअर केले आहेत.

16 ऑक्टोबर 1998 रोजी 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या रिलीजला आज 22 वर्षे पूर्ण झाली आहे. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी स्टारर हा सिनेमा त्यावर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या रिलीजला 22 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री काजोल हिने आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत राहुल आणि अंजलीचे कार्टुन शेअर करुन त्याला #22YearsOfAnjali #KKHHmemories हे हॅशटॅग दिले आहेत.

या चित्रपटातील कॅम्पस, त्यातले प्राध्यापक, प्राध्यापिकेचा स्कर्ट, वर्गातले विनोद, ती मुलामुलींची मैत्री, त्यांच्या पार्ट्या, सगळेच भन्नाट होते. या चित्रपटाने आणि त्यातल्या कॅम्पसने त्यावेळच्या तरुण पिढीला वेड लावले होते. जाणून घ्या चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी...

 • करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट यूकेच्या टॉप टेन बॉलिवूड चित्रपटांमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा ठरला.
 • 'हम आपके है कौन' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला होता. याचे संगीतही प्रचंड गाजले होते. इतकेच नाही तर तब्बल आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा हा एकमेव चित्रपट आहे.
 • करण जोहरचा हा पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. आदित्य चोप्राला असिस्ट केल्यानंतर त्याने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
 • 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटामुळे शाहरुख-काजोल ही जोडी प्रसिद्धीझोतात आली होती. त्यामुळे या दोघांनाच आपल्या पहिल्या चित्रपटात कास्ट करण्याचे करणने ठरवले होते.
 • राणी मुखर्जीने साकारलेली भूमिका सुरुवातील ट्विंकल खन्नाला ऑफर झाली होती. मात्र तिने नाकारल्यानंतर ही भूमिका राणीच्या वाट्याला आली. विशेष म्हणजे स्क्रिप्ट न वाचताच राणीने या चित्रपटासाठी आपला होकार कळवला होता.
 • या चित्रपटात सलमान खानने गेस्ट अपिअरन्स दिला होता. सलमानच्या भूमिकेसाठीही सुरुवातीला सैफ अली खान आणि चंद्रचुड सिंग यांच्या नावांचा विचार झाला होता. मात्र दोघांनीही ही भूमिका नाकारली. त्यानंतर सलमानची वर्णी या सिनेमात लागली.
 • 21 ऑक्टोबर 1997 रोजी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. साडे नऊ महिन्यांच्या कालावधीत या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण झाले होते.
 • या चित्रपटाचा टायटल ट्रॅक हा स्कॉटलंडमध्ये शूट करण्यात आला होता. याच्या चित्रीकरणाला दहा दिवसांचा अवधी लागला होता.
 • 'ये लडका है दिवाना' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान काजोलला गंभीर दुखापत झाली होती.
 • या चित्रपटातील सना सईद परजान दस्तूर या दोन बाल कलाकारांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
बातम्या आणखी आहेत...