आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

4 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे आमिरची मुलगी:23 वर्षांच्या  इराने व्हिडिओ शेअर करुन आपल्या मेंटल हेल्थविषयी सांगितले, म्हणाली - मी क्लीनिकली डिप्रेस्ड आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इरा खानने वर्ल्ड मेंटल हेल्थ डेवर आपल्या डिप्रेशनचा खुलासा केला
  • आमिरच्या मुलीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले - बातचित सुरू करुया

आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी इरा खान चार वर्षांपासून क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करत आहे. हा खुलासा स्वतः इराने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. शनिवारी वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्ताने तिने व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली.

'मी चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे '
व्हिडिओमध्ये इरा म्हणत आहे की, हाय, मी डिप्रेस्ड आहे. मी चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे. मी डॉक्टरांकडे गेले होते. मी क्लिनिकल डिप्रेस्ड आहे. मात्र आता मला बरे वाटत आहे आणि गेल्या एक वर्षांपासून मला मेंटल हेल्थविषयी काही तरी बोलायचे होते. मात्र मला कळत नव्हते की, काय करु?

यामुळे मी ठरवले आहे की, तुम्हाला माझ्या प्रवासावर घेऊन जाऊ आणि पाहू की काय होते. आशा आहे की, आपण स्वतःला चांगले ओळखू शकाल. मेंटल हेल्थला चांगल्या पध्दतीने समजू शकाल. चला तिथून सुरूवात करुया, जेथून मी सुरुवात केली होती. मी का डिप्रेस्ड आहे? मी डिप्रेशनचा होणारी कोण आहे? माझ्याकडे तर सर्व काही आहे ना?

बातचित सुरू करुया
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये इराने लिहिले आहे - खूप काही चालू आहे? अनेक लोक बरेच काही म्हणत आहेत? गोष्टी खरंच कंफ्यूजिंग आणि तणावपूर्ण आणि सोप्या आणि ठिक आहे, पण ठिक नाही. जीवन सर्वांसोबत आहे.

हे सर्व सांगण्याची कोणतीच पध्दत नाही. पण मला वाटते की, मला काही तरी मिळाले आहे, किंवा कमीत कमी समजले की, कसे हे थोडे आणि अधिक समजते. मेंटल हेल्थ आणि मेंटल इल हेल्थविषयी. तर चला या यात्रेत माझ्या सोबत, माझी विचित्र, कधी-कधी लहान मुलांसारखा आवाज. ईमानदारीने जसे मी करु शकते. बातचित सुरू करुया.

इराने थिएटर डेब्यू केला आहे
23 वर्षांच्या इराने गेल्यावर्षी 'यूरिपाइड्स मेडिया' नावाच्या प्लेमधून थिएटरमध्ये डेब्यू केला होता. तिने या प्लेचे डायरेक्शन केले होते. याच शोमधून वरुण धवनची भाजी पुतणी अंजिनी धवनेही अभिनेत्री म्हणून डेब्यू केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser