आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:23 वर्षीय ओडिसी अभिनेत्री रश्मिरेखा ओझा हिची आत्महत्या, वडिलांचा लिव्ह-इन पार्टनरवर आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रश्मी दीड महिन्यापासून बॉयफ्रेंडसोबत राहत होती

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रश्मिरेखा ओझा हिने आत्महत्या केली आहे. 23 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह भुवनेश्वरच्या नयापाली भागात तिच्या भाड्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. वृत्तानुसार, पोलिसांना रश्मिरेखाची सुसाईड नोटही सापडली आहे. दुसरीकडे, रश्मिरेखाच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूला संतोष पात्रा याला जबाबदार आहे. संतोष हा रश्मिरेखा हिचा लिव्ह-इन-पार्टनर होता.

आत्महत्येचे प्रकरण दिसते: डीसीपी
वृत्तानुसार, डीसीपीने सांगितले की, 23 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू 18 जूनच्या रात्री झाला. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. सध्या हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी कोणावरही आरोप केलेला नाही. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत, असे डीसीपींनी सांगितले.

ती संतोषसोबत राहात होती, हे आम्हाला माहीत नव्हते: रश्मीचे वडील
मीडियाशी बोलताना रश्मिरेखाच्या वडिलांनी सांगितले की, मला माझ्या मुलीच्या मृत्यूची बातमी संतोषकडून समजली. शनिवारी रात्री आम्ही तिला अनेक फोन केले, पण तिने कोणालाच प्रतिसाद दिला नाही. रश्मीच्या घरमालकाने सांगितले की, ते दोघेही पती-पत्नी म्हणून राहत होते. पण ते पती-पत्नी नव्हते हे आम्हाला ठाऊक नव्हते.

रश्मी दीड महिन्यापासून बॉयफ्रेंडसोबत राहत होती
ओडिशा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, रश्मिरेखा ही ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील तिर्तोल भागातील होती. गेल्या दीड महिन्यांपासून ती प्रियकर संतोष पात्रासोबत भाड्याच्या घरात राहत होती. गेल्या काही दिवसांपासून तो रश्मीपासून वेगळा राहू लागला होता. रश्मिरेखा हे ओडिशा टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. टीव्ही मालिका 'केमिती कहीबी कहा'मधील भूमिकेसाठी तिला ओळखला जाते.