आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DDLJ ची 25 वर्षे:लंडनच्या लिसेस्टर स्क्वेअरवर उभा राहणार शाहरुख-काजोलचा कांस्य पुतळा, 1995 मध्ये चित्रपटाने बजेटच्या 25 पट केली होती कमाई

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लंडनमध्ये बॉलिवूड चित्रपटातील पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाच्या रिलीजला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याने अनेक विक्रम केले आहेत. 20 ऑक्टोबर 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता आणखी एक इतिहास घडवला आहे. चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने लंडनमध्ये शाहरुख आणि काजोल अर्थातच प्रेक्षकांच्या लाडक्या राज आणि सिमरनचा कांस्य पुतळा बसवला जाणार आहे. लंडनमध्ये बॉलिवूड चित्रपटातील पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याबाबतची माहिती देताना ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी लिहिले आहे की, पुढील वर्षी वसंत ऋतूमध्ये शाहरुख आणि काजोल यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले जाईल. यामध्ये चित्रपटातील एक दृश्य रिक्रिएट केले जाणार आहे.

लंडनच्या लिसेस्टर स्क्वेअरमध्ये सीन इन द स्क्वेअर म्हणून हा पुतळा स्थापित केला जाणार आहे.

  • बजेटच्या 25 पट केली होती कमाई

20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाद्वारे आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. यशराज फिल्म्सच्या अधिकृत वेबसाईटनुसार, चित्रपटाची निर्मिती 4 कोटी रुपयांत करण्यात आली होती आणि त्यावेळी भारतात या चित्रपटाने 89 कोटी आणि परदेशात 13.50 कोटी रुपये कमावले होते. 1995 मध्ये चित्रपटाचे एकूण कलेक्शन 102.50 कोटी झाले होते. आजच्या तारखेनुसार हे कलेक्शन तब्बल 524 कोटी इतके आहे.

  • मराठा मंदिरात आजही सुरु आहे चित्रपट

मुंबई सेंट्रलस्थित मराठा मंदिरात अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. मात्र रोज सकाळी 11.30 वाजता डीडीएलजेचे स्क्रिनिंग होते. मागील 25 वर्षांपासून हा क्रम सुरु आहे. हा चित्रपट छोट्या पडद्यावरही दाखवला जातो. मात्र आजही लोक राज आणि सिमरन यांची लव्ह स्टोरी बघायला आवर्जुन थिएटरमध्ये जातात. मराठा मंदिरचे व्यवस्थापकीय संचालक देसाई यांच्या म्हणण्यानुसार, डीडीएलजेच्या शोवेळी अर्धे थिएटर भरले असते, तर विकेण्डला शो हाऊसफूल असतो.