आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ला 25 वर्षे पूर्ण:4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'डीडीएलजे'ने केली होती 102 कोटींची कमाई, प्रमोशनसाठी बिहाइंड द सीन्स वापरणारा पहिला चित्रपट होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उदय चोप्राने व्हिडिओग्राफर बनून बिहाइंड द सीन फुटेज रेकॉर्ड केले होते.

25 वर्षांपूर्वी म्हणजे 20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज झालेल्या शाहरुख खान आणि काजोल स्टारर फिल्म 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटाने बॉलिवूडला जगभरात एक नवी ओळख दिली. चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात, चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी...

-04 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात 89 कोटींची कमाई केली, तर परदेशात त्याचे कलेक्शन एकुण 13.50 कोटी होते.

- जगभरातील चित्रपटाचा एकुण व्यवसाय 102.50 कोटी इतका होते. आजच्या काळानुसार हिशोब केल्यास, भारतातील 'डीडीएलजे'ची एकूण कमाई 455 कोटी रुपये इतकी आणि इतर देशांमधली 69 कोटी असती. एकुण मिळून त्याचे वर्ल्डवाइड कलेक्शन 524 कोटी रुपये असते.

- 1996 च्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये या चित्रपटाला तब्बल 14 श्रेणीत नामांकने मिळाली होती, त्यापैकी 10 पुरस्कारांवर चित्रपटाने मोहोर उमटवली होती.

'बिहाइंड द सीन' दाखवणारा पहिला चित्रपट

- भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील हा पहिला चित्रपट होता ज्याने आपल्या मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित केला होता. तेव्हापासून तांत्रिकदृष्ट्या त्याला 'बिहांइड द सीन' म्हणून ओळखले जाते. आदित्य चोप्रांचा धाकटा भाऊ उदय चोप्रा त्यांचा असिस्टंट होता आणि त्यानेच मेकिंग रेकॉर्डिंगची जबाबदारी सांभाळली होती. उदयने व्हिडिओग्राफर बनून बिहाइंड द सीन फुटेज रेकॉर्ड केले होते. नंतर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये याचा उपयोग झाला.

किरण खेर यांनी सुचवले होते चित्रपटाचे शीर्षक
- या चित्रपटाचे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हे शीर्षक किरण खेर यांनी सुचवले होते. याचा उल्लेख स्वतः आदित्य चोप्रा यांनी यशराज फिल्म्सने प्रकाशित केलेल्या 'आदित्य चोप्रा रिलिव्स... दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या पुस्तकात केला आहे.

- त्यांनी सांगितले होते की, "किरण जी यांना ही कल्पना 1974 च्या 'चोर मचाए शोर" या चित्रपटातील 'ले जाएंगे..ले जाएंगे...दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हे गाणे ऐकून सुचली होती. जेव्हा मी त्यांच्याकजून ही कल्पना ऐकली, तेव्हा मला ती आवडली आणि शीर्षक अंतिम झाले.''

अमेरिकन चित्रपटातून प्रेरित आहे 'पलट सीन'

- चित्रपटात शाहरुख खानवर चित्रीत करण्यात आलेल्या 'पलट सीन' क्लिंट ईस्टवुड यांच्या 1993 मध्ये आलेल्या 'इन द लाइन ऑफ फायर' या चित्रपटातील एका दृश्यावरुन घेण्यात आला होता.

- आदित्य यांनी जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा इस्टवुडमधील हा सीन त्यांच्या लक्षात राहिला. जेव्हा अभिनेत्याची गर्लफ्रेंड जात असते, तेव्हा तो तिला पलटायला सांगतो, असा हा सीन होता.

- नंतर आदित्य यांनी डीडीएलजेमध्ये तो सीन रिक्रिएट केला. डीडीएलजेची स्क्रिप्ट लिहायला आदित्य यांना एक महिन्याचा काळ लागला होता.

- या चित्रपटात शाहरुखने घातलेले सिग्नेचर लेदरचे जॅकेट उदय चोप्राने कॅलिफोर्नियामधील हार्ले डेव्हिडसन स्टोअरमधून 400 डॉलरमध्ये खरेदी केले होते.

बातम्या आणखी आहेत...