आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा बोहल्यावर चढले केदार शिंदे:पत्नी बेलासोबत दुस-यांदा लग्नाच्या बेडीत अडकले केदार, शर्मन जोशी म्हणाला - "यार केदार हम एकबार शादी करके पछताते हैं और तुमने..."

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो साभार - वसुंधरा साबळे फेसबुक अकाउंट - Divya Marathi
फोटो साभार - वसुंधरा साबळे फेसबुक अकाउंट
  • अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत केदार आणि बेला यांचा लग्नसोहळा पार पडला.

मराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी मोहोर उमटवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या लग्नाला 9 मे रोजी 25 वर्षे पूर्ण झाली. या खास दिवसाचे औचित्य साधत केदार यांनी पुन्हा एकदा पत्नी बेला शेंडेसोबत लग्न थाटले आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत केदार आणि बेला यांचा लग्नसोहळा पार पडला.

25 वर्षापुर्वी केदार आणि बेला यांचे कोर्ट मॅरेज झाले होते. त्यांच्या लग्नाला बेला यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघांना लग्नात कुठलीच हौसमौज करता आली नव्हती. मात्र 25 वर्षांनी दोघांनी तोच क्षण दोघांनी अनुभवयाचे ठरवले. विशेष म्हणजे 25 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेजमुळे त्यांच्या लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते आणि आता लॉकडाऊनमुळेही लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते. मात्र व्हर्च्युअली अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी या लग्नाचे साक्षीदार झाले. केदार आणि बेला शेंडे यांच्या नातेवाईकांसह अभिनेता शर्मन जोशी, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, अंकुश चौधरी यांच्यासह अनेक जवळच्या मित्रांनी ऑनलाईन हा लग्नसोहळा अनुभवला.

फोटो साभार - वसुंधरा साबळे फेसबुक अकाउंट
फोटो साभार - वसुंधरा साबळे फेसबुक अकाउंट

केदार शिंदे यांच्या मावशी वसुंधरा साबळे यांनी सोशल मीडियावर केदार आणि बेला यांच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. सोबत सगळ्यांनी हा लग्नसोहळा कसा अनुभवला तेदेखील सांगितले आहे.

वसुंधरा साबळे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, ' काल सकाळी आपापल्या घरी आम्ही केदारचे सर्व नातेवाईक आणि त्याची मित्रमंडळी रविवार असुनही 11 वाजताचा मुहूर्त चुकू नये म्हणुन लवकर तयारी करुन बसलो होतो.. लग्न सोहळा अगदी साग्रसंगीत सुरु झाला... जे केदार आणि बेलाच्या पहिल्या लग्नात दुरवर कुठेच नव्हते त्यांनी या लग्नातल यजमानपद अत्यंत उत्साहात उचललं होत.. केदार कडून Prashant Gaonkar कुटुंबीय होते तर बेलाकडून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर होते... सगळे विवाहविधी अत्यंत गंभीरपणे सुरु झाले आणि सिध्दार्थ जाधव स्क्रीनवर दिसला, तो त्याच्या घरातुन ओरडून सांगत होता "सर मी तुमच्या लग्नात नाचणार आहे.." आणि तो लग्न लागताच खरंच त्याच्या घरी नाचला सुध्दा... शर्मन जोशी सहकुटूंब सोहळा पाहात होता तो म्हणाला " यार केदार हम एकबार शादी करके पछताते हैं तुमने दुसरीबार ये डेअरींग कैसे कीया?" सोहळ्याच्या जागी लॉकडाऊनमुळे कुणी उपस्थित नसले तरी सगळी धमाल तशीच चालू होती... पहिल्या लग्नात हिरीरीने भाग घेतलेले भरत, अंकुश आज नाईलाजाने घरात बसुन सोहळ्यात सामील झाले होते... बरेच लोक उत्साहाने शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला ऑनलाईन हजर होते.. वाईट याच गोष्टीच वाटलं की त्यावेळी बेला घरातुन पळून आल्यामुळे तिच्या कन्यादानाला मुकलेले तिचे कुटूंबीय या वेळीही लॉकडाऊनमुळे मुकलेच.. ती जबाबदारी मात्र आदेश आणि सुचित्राने मोठ्या आनंदाने पार पाडली... लग्नपत्रिकेत "स्नेहभोजन आपापल्या घरी" असं लिहिल्यामुळे मात्र लग्न लागताच आम्ही सगळेच आपापल्या घरी स्वयंपाकाला लागलो.. अशा प्रकारे काल हा अनोखा विवाह सोहळा सुफळसंपुर्ण झाला...'

फोटो साभार - वसुंधरा साबळे फेसबुक अकाउंट
फोटो साभार - वसुंधरा साबळे फेसबुक अकाउंट

अशी आहे बेला आणि केदार यांची लव्ह स्टोरी
पडद्यावर प्रेमाची विविध रुपे साकारणा-या केदार केदार यांनी लव्ह मॅरेज केले आहे. केदार यांच्या प्रेमाची कहाणीसुद्धा इंट्रेस्टिंग आहे. भेटणे, एकमेकांना पाहणे आणि प्रेमात पडणे अशा सरळ मार्गाने केदार आणि बेला यांचे प्रेम जमले नाही. ‘लोकधारा’च्या निमित्ताने केदार आणि बेला यांची ओळख झाली होती. बेला यांची थोरली बहीण ‘लोकधारा’च्या ग्रुपमध्ये डान्स करायची. एकेदिवशी बेला आपल्या बहिणीचा डान्स पाहायला गेल्या. बेला यांनाही नृत्याची आवड असल्याने त्यासुद्धा या ग्रुपमध्ये सामील झाल्या. त्यावेळी तिथे केदार डान्स शिकवायचे. याचकाळात केदार आणि बेला यांची चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीदरम्यानच त्यांच्यात प्रेम फुलायला लागले होते. केदार यांनीच बेला यांना पहिल्यांदा प्रपोज केले होते. मात्र त्यावेळी बेला यांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. मात्र केदार यांनी हार पत्करली नाही. सतत दोन वर्षे ते बेला यांच्या मागे होते. अखेर बेला यांनी केदार यांच्या प्रेमाचा स्वीकार केला.

केदार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात बेला
बेला शिंदे यांनी सोशॉलॉजी या विषयात पदवीप्राप्त केली आहे. शिवाय त्या भरतनाट्यम शिकल्या आहेत. लग्नानंतर बेला यांनी केदार यांना त्यांच्या कामात मदत करायला सुरुवात केली. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेपासून त्यांचे केदार यांच्यासोबत प्रॉडक्शनचे काम सुरु झाले. आता बेला शिंदे या निर्माती म्हणून नावारुपास आल्या आहेत. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव सना आहे. सना आता 22 वर्षांची आहे.

बातम्या आणखी आहेत...