आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हंटरवाली'चा बॉलिवूडमध्ये बनला होता पहिला सिक्वेल:गेल्या 22 वर्षांत 33 चित्रपटांचे सिक्वेल, काही जबरदस्त हिट तर काही फ्लॉपच्या यादीत जमा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'दृश्यम 2' हा चित्रपट 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'दृश्यम'चा सिक्वेल आहे, जो मुळ मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. बॉलिवूडमध्ये रिमेक आणि बायोपिक चित्रपट तसेच सिक्वेल चित्रपटांचा ट्रेंड अनेक वर्षांपासून सुरु आहे आणि हा ट्रेंड 1935 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हंटरवाली' चित्रपटापासून सुरू झाला. गेल्या 22 वर्षातील चित्रपटांचा रेकॉर्ड पाहिला तर 33 चित्रपटांचे सिक्वेल बनले आहेत.

चला तर मग जाणून घेऊया बॉलिवूडमधील सिक्वेलच्या वाढत्या ट्रेंडबद्दल, जो सुरुवातीपासून आजतागायत कायम आहे-

सिक्वेल चित्रपट बनवण्याचे मोठे कारण

जेव्हा एखादा चित्रपट चांगली कमाई करतो आणि लोकांच्या पसंतीस पडतो, तेव्हा निर्माते चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज करतात. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कथा पहिल्या भागाच्या कथेशी काहीशी निगडीत असते. सहसा, सिक्वल चित्रपट मूळ चित्रपटांइतकीच कमाई करतात परंतु काहींच्या बाबतीत तसे घडत नाही. मूळ चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तरी काही सिक्वेल चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. काही चित्रपटांना प्रेक्षक आणि समीक्षकांनीही पसंती दिली असली तरी कमाईच्या बाबतीत ते चित्रपट मागे पडले आहेत.

'हंटरवाली' या चित्रपटापासून झाली सिक्वेल चित्रपटांची सुरुवात
1935 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हंटरवाली' या चित्रपटापासून सिक्वेल चित्रपटांची मालिका सुरू झाली. हा चित्रपट होमा वाडिया यांनी दिग्दर्शित केला होता. या सिरीजचा दुसरा चित्रपट 1943 मध्ये प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते 'हंटरवाली की बेटी'. यानंतर, सिक्वेल चित्रपटांची मालिका 60 च्या दशकापर्यंत थांबली, परंतु 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ज्वेल थीफ'ने हा ट्रेंड पुन्हा जिवंत केला. तेव्हापासून 'डॉन', 'नागिन', 'घायल', 'धूम' आणि 'क्रिश' या चित्रपटांचे सिक्वेल बनवले गेले.

आता जर आपण सिक्वेल चित्रपटांच्या कमाईबद्दल बोललो, तर काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले आहे, तर काही सिक्वेल चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले आहेत. चला तर मग जाणून घेऊया सिक्वेल चित्रपटांची कमाई कशी झाली-

बातम्या आणखी आहेत...