आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमरस लारा दत्ता कशी बनली इंदिरा गांधी:35 दिवसांची तयारी, दोन ट्रायल, नंतर दररोज 3 तास मेकअप; लाराला इंदिरा यांचा लूक देण्यासाठी करण्यात आले 4 बदल केले

हिरेन अंतानी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेकअप आणि प्रोस्थेटिक आर्टिस्ट प्रशांत डोईफोडे यांना या लूकचे श्रेय जाते.

आगामी 'बेल बॉटम' या चित्रपटातील अभिनेत्री लारा दत्ताच्या इंदिरा गांधी लूकची सध्या बरीच चर्चा होते आहे. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हा इंदिरा गांधींच्या भूमिकेत असलेल्या लाराला कुणी ओळखू शकले नव्हते. मेकअप आणि प्रोस्थेटिक आर्टिस्ट प्रशांत डोईफोडे यांना या लूकचे श्रेय जाते.

मेकअप आर्टिस्टला पुरस्कार तर सोडा पण साधे त्याच्या कामाचे क्रेडिटही दिले जात नाही, अशी खंत प्रशांत यांनी व्यक्त केली आहे. लाराच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या एवढ्या चर्चेनंतर ही परिस्थिती बदलेल अशी त्यांना आशा आहे.

जेव्हा प्रशांत यांना पहिल्यांदा कळले की, लारा चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे, तेव्हा त्यांच्यासाठी हे एक मोठे आव्हान होते. लाराचा इंदिरा गांधींचा लूक तयार व्हायला 35 दिवस लागले. प्रशांत यांनी हा लूक तयार करण्यासाठीची स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.

मेकअप आणि प्रोस्थेटिक आर्टिस्ट प्रशांत डोईफोडे
मेकअप आणि प्रोस्थेटिक आर्टिस्ट प्रशांत डोईफोडे

सर्व प्रथम तुलना आणि 3D कास्टिंग
लाराचा मेकओव्हर करण्यासाठी तिच्या आणि इंदिरा गांधींच्या लूकची प्रथम तुलना करण्यात आली. त्यानंतर लाराच्या घरी 3 डी कास्टिंग करण्यात आले. कोणासाठीही प्रोस्थेटिक लूक तयार करण्यासाठी 3D कास्टिंग ही पहिली पायरी असते. ज्या व्यक्तीवर प्रोस्थेटिक लावायचे आहे त्याचा चेहरा बारकाईने मोजला जातो. यानंतर, प्रोस्थेटिक त्यानुसार बनवले जाते, असे प्रशांत यांनी सांगितले.

दोन ट्रायल झाले, तीन लोकांच्या टीमने काम केले
लाराचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी दोन ट्रायल घेण्यात आल्या. एकदा संपूर्ण लूकचे ट्रायल घेतले गेले. यात बहुतांश लूक पूर्ण झाला होता. परंतु याहून अधिक चांगले करता आले असते, असे वाटले. त्यानंतर उर्वरित गोष्टी सुधारल्यानंतर, दुसरी ट्रायल झाली, जी मंजूर झाली.

या संपूर्ण प्रक्रियेत प्रशांत यांच्यासोबत जगदीश दादा आणि प्रवीण होते. जगदीश दादा सुपरवाइज करायचे आणि प्रवीण सेटवर हजर असायचे. या प्रकारचा मेकअप साध्य करण्यासाठी कलाकाराकडून पूर्ण समर्पण आवश्यक असते. लाराने यामध्ये पूर्ण सहकार्य केले.

सातत्य राखण्याचे आव्हान
या प्रकारच्या मेकअपमध्ये सातत्य राखणे हेही मेकअप आर्टिस्टसाठी मोठे आव्हान असते. लाराच्या मेकअपला 3 तास लागत असे. शूटिंग संपल्यानंतर मेकअप काढण्यासाठी दीड तास लागायचा.

या मेकअपसह शॉट देणे सोपे नसते. उदाहरणार्थ, प्रोस्थेटिक नाकाला घाम किंवा खाज सुटली तर त्याला स्पर्श करत येत नसतो. दिवसभर या मेकअपमध्ये राहणे सोपे नसते, असे प्रशांत सांगतात.

प्रोस्थेटिक साहित्य परदेशातून यायचे
प्रोस्थेटिक आणि मेक-अपचे सर्व साहित्य यूएस किंवा यूकेमधून येते. पूर्वी लॅटेक्स किंवा लेटेक्स फोम प्रोस्थेटिक्ससाठी वापरला जात असे. आता हे काम सिलिकॉन आणि जिलेटिन सारख्या साहित्यात केले जाते. प्रशांत संपूर्ण पूर्ण प्रोस्थेटिक्स त्यांच्या वर्कशॉपमध्ये तयार करतात.

मेकअप पूर्वी स्टिक पॅन केक असायचा. त्यानंतर क्रीम बेस, लिक्विड बेस आणि आता अल्कोहोल बेसचा वापर केला जातो. ब्रश व्यतिरिक्त, काही ठिकाणी विशेष मेकअप स्प्रे देखील वापरला जातो.

लॉकडाउनमुळे सर्व साहित्य स्टॉक केले होते
कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण झाले. मेकअपमध्ये कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे सर्वात कठीण होते. सर्व मेक-अप साहित्य आणि मेकअप व्हॅन सॅनिटाइज केली जायची. लॉकडाउनमुळे सर्व साहित्य आणि इतर पीसचे अॅडव्हान्स स्टॉक करुन ठेवण्यात आले होते.

मेकअपची चर्चा केली जाते, पण मेकअप आर्टिस्टची नाही
प्रशांत सांगतात की, 'मेरिडियन' या अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपटात आम्ही अर्जुन रामपालला प्रोस्थेटिकच्या मदतीने वृद्ध व्यक्तीचे रूप दिले होते, ते बघून त्याचे कुटुंबीयदेखील त्याला ओळखू शकले नाहीत. त्यांनीच 'कहानी' चित्रपटात विद्या बालनसाठी आर्टिफिशियल बेली बनवली होती. यातील विशेष गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये विद्या ते पोट काढताना दाखवले जाणार होते.

चित्रपटाशिवाय प्रोस्थेटिक्सचा वापर प्रमोशनमध्येही केला गेला आहे. अजय देवगण आणि काजोलच्या 'टुनपूर का सुपर हिरो' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रोस्थेटिकने कार्टून कॅरेक्टर्स बनवण्यात आले होते, त्याचे खूप कौतुक झाले होते.

प्रशांत सांगतात की, शूटिंग दरम्यान अभिनेत्याचा दिवस मेकअप रूममधून सुरू होतो आणि शूटिंगनंतर मेकअप रूममध्येच दिवस संपतो. चित्रपटांमध्ये मेकअपचे हेच महत्त्व आहे. त्यामुळे मेक-अप कलाकारालाही एक कलाकार म्हणून पूर्ण सन्मान मिळाला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...