आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम्राट पृथ्वीराज:मानुषीने चित्रपट साइन केल्यानंतर 9 महिने रोज 4 तास अभिनयाचा सराव केला, म्हणाली - आदित्य हा पहिला माणूस होता...

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकत आहे. आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यानिमित्ताने मानुषीसोबत साधलेला हा खास संवाद -

  • मिस वर्ल्ड झाल्यानंतर फक्त यशराजच संपर्कात होते की इतर निर्मात्यांनी तुला चित्रपटासाठी ऑफर दिली होती?

मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर लगेचच माझ्या मनात अभिनयाचा विचार आला नव्हता. मला माझे शिक्षण पूर्ण करायचे होते. फिल्म इंडस्ट्रीतील लोक माझ्या मॅनेजमेंट टीमच्या संपर्कात होते. त्यादरम्यान मी यशराजमध्ये आदित्य चोप्रालाही भेटले होते. आदित्य हा पहिला माणूस होता, ज्याने मला सांगितले, मी अभिनय करू शकते. माझे ऑडिशन झाले. खूप नंतर सांगण्यात आले, मला राजकुमारी संयोगिताची भूमिका करायची आहे. उरला निर्मात्यांचा प्रश्न तर ते लवकरच घोषणा करतील.

  • तुझा आनंद कसा व्यक्त करशील?

रोज नवा अनुभव येत होता. माझा हा पहिला चित्रपट म्हणून नव्हे तर यासाठी हजारो लोकांनी मेहतन घेतली आहे. आता त्या मेहनतीचे चीज होताना दिसणार आहे. चित्रपट नक्कीच लोकांना आवडेल, अशी आशा आहे. आनंदाबरोबरच थोडी भीतीदेखील वाटत आहे. पण आज फायनली चित्रपट रिलीज होत आहे आणि लोक तो पाहणार आहेत.

  • कोरोनामुळे तुला बरीच प्रतीक्षा करावी लागली. त्या काळात काय केले ?

आयुष्यात कोणतीही वेळ आली तरी आपल्याला ती निभावून न्यावी लागते. कारण त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. प्रत्येक माणसाला आपल्यावर आलेल्या वेळेचा सामना करावाच लागतो. सुदैवाने पहिला लॉकडाऊन लागला तेव्हा मी आणखी एक चित्रपट साइन केला होता. त्यामुळे मी फक्त ‘सम्राट पृथ्वीराज’ची वाट पाहत थांबले नाही, तर दुसरा चित्रपटही पूर्ण केला. मात्र दुसरा लॉकडाऊन लागला तेव्हा थिएटर्स कधी उघडतील असे वाटू लागले होते. चित्रपट कधी येईल, कारण तो थिएटर्ससाठी बनला आहे.

बातम्या आणखी आहेत...