आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्युनिअरचे स्वागत:चिरंजीवी सरजाच्या निधनाच्या 4 महिन्यांनंतर पत्नी मेघनाने दिला मुलाला जन्म, काका ध्रुवने दोन दिवसांपूर्वीच खरेदी केला होता 10 लाखांचा चांदीचा पाळणा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाळाच्या आगमनाच्या बातमीनंतर चिरंजीवी यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर आनंद साजरा केला.

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे चार महिन्यांपूर्वीहृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 39 वर्षीय सरजाच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता, पण आता हा हळूहळू सर्वजण या दुःखातून सावरत आहेत. शिवाय सरजा यांच्या घरात एका चिमुकल्याच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिरंजीवी यांची पत्नी मेघनाने गुरुवारी त्यांच्या मुलाला म्हणजे ज्युनिअर चिरंजीवीला जन्म दिला. या बातमीनंतर चिरंजीवी यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर आनंद साजरा केला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ज्युनियर आपल्या वडिलांच्या फोटोसह दिसत आहे. मेघना आणि चिंरजीवी यांचे हे पहिलेच बाळ आहे. दोन दिवसांपूर्वीच चिरंजीवी यांचा भाऊ आणि अभिनेता ध्रुव सरजा यांनी बाळासाठी दहा लाख किंमतीचा चांदीचा पाळणा खरेदी केला होता.

दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न
चिरंजीवी यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1980 रोजी झाला होता. दोन वर्षांपूर्वी 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत त्यांचे लग्न झाले होते. सरजा यांनी एकूण 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. लॉकडाऊनच्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला ‘शिवारार्जुन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

View this post on Instagram

❤❤❤❤

A post shared by padma creation (@padm6778) on Oct 21, 2020 at 11:43pm PDT

बाळाची आतुरतेने वाट पाहत होते
7 जून रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास सरजा आपल्या वडिलांशी फोनवर बोलत होते, त्याचदरम्यान त्यांना अचानक घाम फुटू लागला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. चिरंजीवी आपल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र बाळाच्या जन्मापूर्वीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.