आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कर्ज'ची 41 वर्षे:18 वर्षांपासून बेपत्ता आहे रवी शर्माची भूमिका वठवणारे राज किरण, ऋषी कपूर यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा अटलांटाच्या मनोरुग्णालयात असल्याचे आले होते समोर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 18 वर्षांपासून राज किरण हा अभिनेता बेपत्ता आहे.

1980 मध्ये आलेल्या कर्ज या चित्रपटाच्या रिलीजला 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात ऋषी कपूर, सिमी ग्रेवाल यांच्यासह राज किरण यांची महत्त्वाची भूमिका होती. राज किरण यांनी चित्रपटात रवी वर्मा हे पात्र साकारले होते. गेल्या 18 वर्षांपासून राज किरण हा अभिनेता बेपत्ता आहे.

कधी अमेरिकेत कॅब चालवत असल्याची तर कधी अटलांटा येथील मनोरुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले गेले. अनेकांनी तर राज किरण आता या जगात नाही, असेही म्हटले होते. पण काही वर्षांपूर्वी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांचा शोध घेतला आणि ते अटलांटा येथील मनोरुग्णालयातच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र राज किरण यांचे कुटुंब या वृत्ताचे खंडन करतात.

या चित्रपटांसाठी ओळखले जातात राज किरण
राज किरण यांनी 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 1982 साली स्मिता पाटील आणि शबाना आझमी स्टारर 'अर्थ' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. 1980 मध्ये 'कर्ज' या चित्रपटात ऋषी कपूर आणि 1988 मध्ये 'एक नया रिश्ता' या चित्रपटात रेखासोबत त्यांनी काम केले. 1994 मध्ये आलेल्या 'वारिस' या चित्रपटात आणि शेखर सुमनच्या 'रिपोर्टर' या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. 2003 पासून राज किरण बेपत्ता होता.

जेव्हा राज किरण याच्या मृत्यूची बातमी पसरली, तेव्हा ऋषी कपूर यांचा यावर विश्वास बसला नाही, आणि त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला होता.

यूएसमध्ये राज किरणच्या भावाला भेटले होते ऋषी कपूर
2011 मध्ये ऋषी कपूर अमेरिकेला गेले होते. तेथे राज किरण याचे बंधू गोविंद मेहतानी यांच्याशी ऋषी कपूर यांची भेट झाली आणि हा विषय समोर आला. गोविंद मेहतानी यांनीच ही माहिती ऋषी कपूर यांना दिली. ऋषी कपूर यांनी राज किरणची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण गोविंद मेहतानींकडे धाकट्या भावाचा मोबाईल नंबरही नव्हता.

त्यावेळी ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, "मी विचारातच होतो की, राज कुठे गेला असेल? हा प्रश्न वारंवार माझ्या मनात येत होता. त्यामुळे मी यूएसमध्ये राज किरणचा शोध घेण्यासाठी त्याचा मोठा भाऊ गोविंद मेहतानीशी संपर्क साधला. त्यानंतर मला तो अटलांटामध्ये असल्याचे समजले. तो जिवंत आहे, हे कळल्यानंतर मला बरे वाटले. पण राजला मनोरुग्णालयात ठेवण्यात आले आहे. राज स्वतःच्या उपचारांचा खर्च स्वतःच उचलत आहे. यासाठी तो हॉस्पिटमध्येच काम करतो."

भाऊ म्हणाला होता - माझ्याजवळ नंबर नाही
राज किरण यांना दोन भाऊ आहेत. मोठ्या भावाचे नाव गोविंद मेहतानी आणि छोट्या भावाचे नाव अजीत मेहतानी आहे. ऋषी कपूर यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा त्यांनी गोविंदजवळ राजचा नंबर मागितला, तेव्हा माझ्याजवळ त्याचा नंबर नाही, असे म्हणून गोविंद मेहतानीने ऋषी कपूर यांना टाळले होते. ऋषी कपूर यांचे म्हणणे होते की, "मला फोनवरुन राजसोबत बोलायचे आहे. मी स्वतः तेथे जाऊन त्याला घरी परत आणणार होतो.’ ऋषी कपूर यांनी या मुलाखतीत म्हटले होते, की ते राज किरणला मुंबईत परत आणू इच्छित होते आणि त्याला परत चित्रपटांमध्ये काम करताना बघायचे होते.

दीप्ती नवल यांनीही केला होता राज किरण बेपत्ता असल्याचा उल्लेख
अभिनेत्री दीप्ती नवल यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून राज किरण बेपत्ता असल्याचे म्हटले होते. त्यांनी लिहिले होते, "चित्रपटसृष्टीतील माझ्या एका मित्राचा शोध मी घेतेय. त्याचे नाव राज किरण आहे. त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये. अखेरचे माझ्या ऐकिवात आले होते की, तो न्यूयॉर्कमध्ये कॅब चालवतो. जर तुमच्याजवळ त्याची काही माहिती असल्यास मला नक्की कळवा." दीप्ती नवल यांनी 1990 मध्ये आलेल्या ‘घर हो तो ऐसा’ सह चार चित्रपटांमध्ये राज किरण यांच्यासोबत काम केले होते. ऋषी कपूर यांचे मागील वर्षी कर्करोगाने निधन झाले.

या चित्रपटांमध्ये झळकले होते राज किरण
'प्यार का मंदिर', 'नाखुदा', 'अर्थ', 'राज तिलक', 'इल्जाम', 'घर हो तो ऐसा', ‘कर्ज', 'तेरी मेहरबानियां', किस्सा कुर्सी का', आणि 'वारिस' या चित्रपटांमध्ये राज किरण यांनी काम केले होते. सुभाष घई आणि महेश भट या दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...