आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'डॉन' चे 42 वर्ष:जेव्हा 22 दिवसांत प्रदर्शित झाले अमिताभ बच्चनचे 4 चित्रपट, 'डॉन'सह तिन्ही चित्रपट ठरले सुपरहिट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरुवातील कोणीही डॉन ची स्क्रिप्ट खरेदी करण्यात तयार नव्हते

अमिताभ बच्चन स्टारर 'डॉन'च्या रिलिजला आज 42 वर्ष पूर्ण होत आहेत. हा चित्रपट 12 मे 1978 रोजी रिलिज झाला होता. आणि बिग बींचा 3 चित्रपटांपैकी एक होता जे 22 दिवसांत पडद्यावर आले आणि सुपरहिट झाले. याशिवाय अमिताभ यांचा आणखी एक 'बेशर्म' याच काळात रिलीज झाला होता. पण तो पदड्यावर म्हणावा तसा प्रभाव दाखवू शकला नाही. 

अमिताभला आली डॉनची आठवण 

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर डॉन च्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी लिहिले की, "डॉनचे 42 वर्ष. काही आठवणी... नूतनजी सोबत फिल्मफेयरचा बेस्ट अॅक्टर अवॉर्ड घेताना. निर्माता नरीमन इराणी, चंद्रा बरोट (दिग्दर्शक), जया आणि मी फिल्मफेयर अवॉर्ड कार्यक्रमात. फिल्म रिलीज होण्यापूर्वी आम्ही निर्माते नरीमन इराणी यांना गमावले होते. मी हा पुरस्कार त्यांच्या पत्नीला समर्पित केला होता."

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 5 महिन्यांपूर्वी डिसेंबर 1977 मध्ये नरिमन इराणी यांचे निधन झाले होते. 1978 मध्ये अमिताभला तिन्ही चित्रपट (डॉन, त्रिशूल आणि मुकद्दर का सिकंदर)साठी फिल्मफेयरमध्ये बेस्ट अॅक्टर म्हणून नामांकन मिळाले होते. 

इराणी यांना कर्जातून सावरण्यासाठी बनवला होता डॉन 

नरीमन इराणी निर्माते होण्यापूर्वी सिनेमॅटोग्राफर होते. त्यांनी दोन चित्रपटांची निर्मिती केली होती. सुनील दत्त स्टारर 'जिंदगी-जिंदगी' आणि अमिताभ स्टारर 'डॉन'. 'जिंदगी-जिंदगी' वाईटरित्या फ्लॉप झाला आणि इराणी यांच्यावर 12 लाख रुपये (त्या काळात मोठी रक्कम होती) कर्ज झाले होते. आर्थिक अडचणीतून मुक्त होण्यासाठी अमिताभ बच्चन, झीनत अमन, चंद्र बरोट आणि मनोज कुमार यांनी त्यांना आणखी एक चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला, जो डॉन होता.

कोणालाही 'डॉन' स्क्रिप्ट खरेदी करायची नव्हती

चंद्र बरोट आणि नरिमन इराणी यांच्या अगोदर सलीम-जावेद कडून कोणीही डॉनची स्क्रिप्ट खरेदी करण्यास तयार नव्हते. देव आनंद, प्रकाश मेहरा आणि जितेंद्र यांनी डॉनला नाकारले होते. तोपर्यंत, स्क्रिप्टला कोणतेही शीर्षक देण्यात आले नव्हते. डॉन स्क्रिप्टमधील फक्त एक पात्र होते. नरिमन इराणी जेव्हा सलीम खान यांच्याकडे गेले तेव्हा ते म्हणाले- 'आमच्याकडे ब्रेकफास्ट स्क्रिप्ट आहे, जो कोणी घेत नाही.' नरीमन इराणी याला होकार दिला आणि अशाप्रकारने डॉन ची निर्मिती झाली. 

बातम्या आणखी आहेत...