आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी कॅन्सरशी झुंज देत आहे. नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन याचा खुलासा केला आहे. या व्हिडिओमध्ये महिमाने तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे उघड केले आहे. अनुपम खेर यांनी मला एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी बोलावले होते, तेव्हा मी त्यांना माझ्या आजाराबद्दल सांगितले, असे महिमा या व्हिडिओत सांगतोय. यावेळी ती भावूक झालेली दिसली. व्हिडिओ शेअर करताना अनुपम यांनी महिमाला हिरो म्हटले आहे.
या व्हिडिओमध्ये महिमाचा बाल्ड लूक लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. या सगळ्यात दिलासादायक बाब अशी की, स्क्रिनिंगच्यावेळी महिमाला आपल्याला कॅन्सर असल्याचे कळले होते. तिने वैदयकीय उपचार घेऊन त्याजागेवरील कँसर सेल हटविल्या आहेत.
महिमा ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे
अनुपम यांनी लिहिले, "माझा 525 व्या चित्रपट 'द सिग्नेचर'मध्ये मुख्य भूमिकेसाठी विचारणा करण्यासाठी मी महिमा चौधरीला महिन्याभरापूर्वी अमेरिकेतून फोन केला होता. तेव्हा मी अमेरिकेत होतो. आमची चांगली चर्चा झाली आणि तेव्हाच मला कळले की ती स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. तिची जीवन जगण्याची पद्धत, संघर्ष आणि दृष्टिकोन जगभरातील अनेक महिलांना नवीन प्रेरणा देऊ शकते," असे अनुपम म्हणाले.
अनुपम म्हणाले - महिमा पुन्हा अभिनयात परतण्यास तयार आहे
अनुपम यांनी पुढे लिहिले की, 'तिचा हा प्रवास मी सर्वांसमोर आणावा अशी तिची इच्छा होती. लोकांना हे सांगताना मी त्याचा एक भाग व्हावे, अशी तिची इच्छा होती. तिने माझे कौतुक केले, पण मला 'महिमा तू माझी हिरो आहेस' असे म्हणायचे आहे. मित्रांनो! तिला तुमचे प्रेम, शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वाद द्या. आता ती सेटवर परतली आहे. ती पुन्हा उड्डाण करण्यास तयार आहे. जय हो,' असे ते म्हणाले.
महिमाने हा व्हिडिओ री शेअर करत अनुमप खेर यांचे आभार व्यक्त केले आहेत. तिने लिहिले, 'तुमच्या प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! अनुपम खेर'.
महिमाने 1999 पासून केली आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात
महिमाचा जन्म 13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंगमध्ये झाला. त्यानंतर महिमाने तिच्या करिअरची सुरुवात 1999 मध्ये आलेल्या 'परदेस' या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. मात्र, या चित्रपटानंतर तिला पुन्हा हवे तसे यश मिळाले नाही. 2006 मध्ये महिमाने बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले आणि 2013 मध्ये दोघे विभक्त झाले. महिमाला एक मुलगी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.