आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉनी डेप VS अंबर हर्ड:हॉलिवूड स्टार्सच्या मानहानी प्रकरणातील 5 मोठ्या गोष्टी, जाणून घ्या डेपला हर्डपेक्षा जास्त भरपाई का मिळाली?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर -

हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री अंबर हर्ड यांच्यात सुरू असलेल्या हाय प्रोफाइल मानहानीच्या प्रकरणात बुधवारी ज्युरीने निर्णय दिला आहे. ज्यात जॉनी डेपच्या बाजुने निकाल लागला आहे. सहा आठवडे हा खटला सुरु होता.

आठ पानांच्या निकालपत्रात डेपच्या हर्डविरुद्धच्या खटल्याशी संबंधित 24 प्रश्न आणि त्याच्याविरुद्धच्या बचावाशी संबंधित 18 प्रश्न होते. सर्व विधाने बदनामीकारक होती हे दोघांनाही सिद्ध करणे आवश्यक होते आणि भरपाई किंवा दंडात्मक नुकसान प्राप्त करण्यासाठी, ज्युरीला हे शोधणे आवश्यक होते की त्यांची विधाने वास्तविक द्वेषाने केली जात आहेत का? तसेच ही विधाने खरी की खोटी हे देखील त्यांना पडताळून पाहायचे होते. या खटल्यात जॉनी डेपला पुर्वाश्रमीच्या पत्नीपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.

जॉनी डेप विरुद्ध अंबर हर्ड मानहानी प्रकरण 5 पॉइंट्समध्ये समजून घेऊया -

1. 58 वर्षीय जॉनी डेपने 2018 मध्ये द वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाबद्दल माजी पत्नी अंबर हर्डविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. जॉनी डेपची पुर्वाश्रमीची पत्नी अंबरने 2018 च्या लेखात स्वत:ला "घरगुती अत्याचाराचे प्रतिनिधित्व करणारी सार्वजनिक व्यक्ती" म्हटले होते. यानंतर अंबरने डेपवर मानहानीचा खटलाही दाखल केला होता. हे प्रकरण डेपच्या वकिलाच्या विधानाबाबत होते.

जॉनी डेप आणि अंबर हर्ड 2009 मध्ये 'द रम डायरी'च्या सेटवर भेटले आणि काही वर्षांनी दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.
जॉनी डेप आणि अंबर हर्ड 2009 मध्ये 'द रम डायरी'च्या सेटवर भेटले आणि काही वर्षांनी दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.

2. या हायप्रोफाईल प्रकरणाने जगभरात चर्चा एकवटली. ट्रायल्सदरम्यान अंबर हर्डने तिच्या साक्षीत सांगितले की, डेप तिला मारहाण करायचा. डेपवर लैंगिक हिंसाचाराचे आरोपही झाले. डेपनेसुद्धा हर्डवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

कोर्ट ट्रायल्सदरम्यान 'पायरेट्स ऑफ द कॅरेबियन' स्टार जॉनी डेप. ट्रायल्सच्या सुरुवातीपासूनच जॉनीची बाजू बळकट दिसत होती.
कोर्ट ट्रायल्सदरम्यान 'पायरेट्स ऑफ द कॅरेबियन' स्टार जॉनी डेप. ट्रायल्सच्या सुरुवातीपासूनच जॉनीची बाजू बळकट दिसत होती.

3. जॉनी डेप आणि अंबर हर्ड या हायप्रोफाइल कायदेशीर लढाईत 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' स्टार जॉनी डेपचा विजय झाला आहे. या कायदेशीर लढाईत एकापाठोपाठ एक अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. या खटल्यातील ज्युरीने अंबर हर्डला मानहानीसाठी दोषी ठरवले आणि तिने जाणीवपूर्वक जॉनी डेपची बदनामी केली, असा निर्णय दिला. डेपला 15 मिलियन डॉलर्स (सुमारे 116 कोटी रुपये) नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याच वेळी हर्डलाही 2 मिलियन डॉलर्स (सुमारे 15.5 कोटी रुपये) भरपाई देण्याचा निर्णयदेखील देण्यात आला आहे. अंबर हर्डने 2018 मध्ये लैंगिक हिंसाचारावर डेपच्या विरोधात एक लेख लिहिला होता. या लेखामुळे डेपची प्रतिष्ठा मलिन झाली. हा लेख दुर्भावनापूर्ण हेतूने लिहिला गेला असल्याचे आढळले. ज्युरीने डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड या दोघांनाही बदनामीसाठी जबाबदार धरले आहे. ज्युरीला असेही आढळले की, डेपचे वकील अ‍ॅडम वाल्डमन यांनी हर्डच्या विरोधात विधाने केली, ज्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. त्यामुळे हर्डलाही 2 मिलियन डॉलर्स भरपाई मिळेल.

अभिनेत्री अंबर हर्ड हिने जॉनी डेपविरोधात अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा दावा केला होता. कोर्टात सुनावणी सुरू असताना तिला रडू कोसळले होते.
अभिनेत्री अंबर हर्ड हिने जॉनी डेपविरोधात अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा दावा केला होता. कोर्टात सुनावणी सुरू असताना तिला रडू कोसळले होते.

4. निकाल आल्यानंतर डेप म्हणाला की, ज्युरीने मला माझे आयुष्य परत दिले आहे. सत्य कधीच हरत नाही. माझे नवीन आयुष्य सुरू होणार आहे. निकाल काहीही लागला असता, पण सत्य बाहेर आणणे हा या खटल्याचा उद्देश होता.

5. या निकालावर प्रतिक्रिया देताना अंबर हर्डने हा निर्णय महिलांसाठी धक्का असल्याचे म्हणत न्यायालयाच्या निर्णयाला निराशाजनक म्हटले आहे. या निर्णयामुळे मी निराश असल्याचे तिने सांगितले. या निकालावर प्रतिक्रिया देताना हर्ड पुढे म्हणाली, आज मला जी निराशा वाटतेय ती शब्दांपलीकडची आहे. माझ्या पुर्वाश्रमीच्या पतीच्या अमर्याद शक्ती, प्रभाव आणि प्रसिद्धीचा सामना करण्यासाठी इतके पुरावे पुरेसे नव्हते याचे मला दु:ख आहे.

जॉनी डेपचा खटला त्याच्या वकील केमिली वास्केज लढत होत्या. यावेळी वास्केज यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.
जॉनी डेपचा खटला त्याच्या वकील केमिली वास्केज लढत होत्या. यावेळी वास्केज यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.

या आधारे न्यायालयाने निकाल दिला
व्हर्जिनियामधील सात सदस्यीय ज्युरीला असे आढळले की, हर्डने 2018 मध्ये लैंगिक हिंसाचारावर डेपच्या विरोधात एक लेख लिहिला होता. या लेखामुळे डेपची प्रतिष्ठा मलिन झाली. हा लेख दुर्भावनापूर्ण हेतूने लिहिला गेला असल्याचे आढळले. ज्युरींनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड या दोघांनाही बदनामीसाठी जबाबदार धरले आहे.

ज्युरीला असेही आढळले की, डेपचे वकील अ‍ॅडम वाल्डमन यांनी हर्डच्या विरोधात विधाने केली, ज्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. त्यामुळे हर्डलाही 2 मिलियन डॉलर्स भरपाई मिळेल.

बातम्या आणखी आहेत...