आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला माहित आहे का?:आशा पारेखच नव्हे तर बॉलिवूडच्या या 4 अभिनेत्रीदेखील प्रेमभंगानंतर आयुष्यभर राहिल्या अविवाहित, जाणून घ्या त्यांच्याविषयी

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आशा पारेख यांनी सांगितले होते, की एक पुरुष त्यांच्या आयुष्यात होता.

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा भोसले यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 78 वर्षे (2 ऑक्टोबर 1942) पूर्ण केली आहेत. 1959 ते 1973 या काळात त्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्या आता डान्स अकादमी चालवत आहेत. 1959 मध्ये 'दिल दे के देखो' या सिनेमात दिग्दर्शक नासिर हुसैन यांनी आशा पारेख यांना शम्मी कपूर यांच्यासोबत कास्ट केले होते. याच काळात आशा पारेख आणि नासिर यांच्यात सूत जुळले होते. मात्र त्यावेळी नासिर विवाहित होते.

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आशा पारेख यांनी सांगितले होते, की एक पुरुष त्यांच्या आयुष्यात होता. मात्र आपल्या खासगी आयुष्याविषयी जास्त बोलणे त्यांनी टाळले होते. नासिर यांचे 2002मध्ये निधन झाले. आशाजींनी सांगितले होते, की नासिर यांच्या निधनाच्या एका दिवसापूर्वीच त्यांचे त्यांच्याशी बोलणे झाले होते.

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. काहींचे प्रेम यशस्वी होते, तर काहींना प्रेमभंगाला सामोरे जावे लागते. हिंदी सिनेसृष्टीतील काही नायिका अशा आहेत, ज्यांचे एखाद्यावर प्रेम जडले खरे, मात्र ते नाते पुढे जाऊ शकले नाही आणि त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. जाणून घेऊयात, बी टाऊनमधील अशाच नायिकांविषयी ज्या प्रेमभंगानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या...

अभिनेत्री नंदा

अभिनेत्री नंदासुद्धा आयुष्यभर अविवाहित राहिल्या होत्या. 25 मार्च 2014 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्याविषयी असे सांगितले जाते, की त्यांना अनेकदा लग्नाचे प्रस्ताव मिळाले होते. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या लग्नासाठी नकार द्यायच्या. असे म्हटले जाते, की नातेवाईकांच्या आग्रहानंतर त्यांनी दिग्दर्शक-निर्माते मनमोहन देसाई यांच्यासोबत साखरपुडा केला होता. मात्र दोन वर्षांनी त्यांचे निधन झाले. त्यानंतर नंदा यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता.

अभिनेत्री परवीन बाबी

परवीन बाबी एक अशी अभिनेत्री होती, जिचे तीन अफेअर चर्चेत होते. मात्र तरीदेखील ती आयुष्यभर अविवाहित राहिली. डॅनी, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबतचे परवीनचे प्रेमसंबंध जगजाहीर होते. विशेषतः कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत तिचे नाते ब-याच काळापर्यंत होते. 1977मध्ये सुरु झालेले महेश भट्ट यांच्यासोबतचे नाते 1980मध्ये संपुष्टात आले होते. महेश भट्ट यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर ती अमेरिकेत निघून गेली होती. मात्र काही वर्षांनी ती परतली. 2005 मध्ये रहस्यमयरित्या मृत्यू झाला. 70 ते 80 दशकातील परवीन बाबी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री होती.

अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडीत

1975 मध्ये 'उलझन' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता संजीव कुमार यांच्यावर सुलक्षणा पंडित यांचा जीव जडला होता. याच सिनेमाद्वारे सुलक्षणा यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. संजीव कुमार यांना त्यांनी लग्नाची मागणीसुद्धा घातली होती. मात्र त्यावेळी संजीव यांनी हेमामालिनीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र हेमा यांनी ती मागणी फेटाळली होती. त्यामुळे संजीव त्याकाळात बरेच दुःखी होते आणि त्यांनी सुलक्षणाला नकार दिला. त्यांच्या नकारामुळे सुलक्षणा मनोरुग्ण झाल्या. आपल्या छोट्याशा अभिनय कारकिर्दीत सुलक्षणा यांनी अमिताभ बच्चन, संजीव कुमार, जितेंद्र, शम्मी कपूर, राजेश खन्ना या अभिनेत्यांसोबत काम केले होते.

अभिनेत्री आणि गायिका सुरैय्या

सुरैय्या आणि देव आनंद यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमधील एक शोकांतिका आहे. 1948मध्ये 'विद्या' या सिनेमातील 'किनारे किनारे चले जाएंगे' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान बोट उलटण्याच्या दुर्घटनेत देव आनंद यांनी सुरैया यांचे प्राण वाचवले होते. यानंतर दोघांमध्ये सूत जुळले होते. मात्र सुरैयाच्या आजीला त्यांचे हे नाते मान्य नव्हते. आजीमुळेच सुरैय्या आणि देव साहेबांचे लग्न होऊ शकले नव्हते. या दोघांचे नाते संपुष्टात आल्यानंतर देव साहेबांनी अभिनेत्री कल्पना कार्तिकसोबत लग्न केले, मात्र सुरैय्या देव साहेबांपासून विभक्त झाल्यानंतर फार खचून गेल्या आणि आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. 2004मध्ये वयाच्या 74व्या वर्षी सुरैया यांचे कॅन्सरमुळे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...