आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थाला अजितचे चित्रपट:'वीरम' ते 'नरकोंडा पारवाई' पर्यंत, OTT वर उपलब्ध आहेत साऊथ सुपरस्टार अजितचे हे 5 सुपरहिट चित्रपट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाहुया कोणते आहेत सुपरस्टारचे सुपरहिट चित्रपट -

साऊथचा सुपरस्टार अजित कुमारचा ‘वलीमाई’ हा चित्रपट 24 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अजितचे 'व' या शब्दाशी खास नाते आहे. ते म्हणजे 'वीरम', 'वेदलाम', 'विवेगम', 'विश्वासम', नंतर आता 'वलीमाई'.... त्याच्या गाजलेल्या चित्रपटांचे शीर्षक 'व' या अक्षरापासून सुरु होते. अजितचे 'वीरम', 'मनकथा', 'येन्नई अरिंधाल' आणि 'विश्वासम'सारखे अनेक सुपरहिट चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Zee5, Disney Hotstar आणि Voot अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. पाहुया कोणते आहेत सुपरस्टारचे सुपरहिट चित्रपट -

वीरम- ZEE5

हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपटांच्या यादीत समावेश आहे. या चित्रपटात अजित हा चार जणांच्या कुटुंबातील सर्वात मोठा आहे जो आपल्या प्रेमाच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जातो. या चित्रपटात तमन्ना भाटियाही मुख्य भूमिकेत झळकली होती.

मनकथा- Disney Hotstar

हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे, जो ऑगस्ट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेत्याचा हा 50 वा चित्रपट होता. क्रिकेट सट्टेबाजीच्या पैशांच्या चोरीभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची कथा मुंबईवर बेतलेली आहे. ज्यामध्ये चार चोरांची टोळी चोरी करते, त्यात पाचवा व्यक्ती सामील होतो. चोरी आणि खोडसाळपणाचे हे एक मनोरंजक मिश्रण आहे.

येन्नई अरिंधाल - Voot

'येन्नई अरिंधाल' हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेला तामिळ अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अजित कुमार आणि तृषा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तामिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध पोलीस चित्रपटांपैकी एक आहे.

नरकोंडा पारवाई - ZEE5

ऑगस्ट 2019 मध्ये प्रदर्शित झालेला 'नारकोंडा पारवाई' हा तामिळमधील एक लीगल ड्रामा आहे. हा 'पिंक'चा अधिकृत रिमेक आहे, ज्यामध्ये थाला अजितने वकिलाची भूमिका साकारत. 'पिंक'मध्ये ही भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती.

विश्वासम-Disney Hotstar

'विश्वासम' ही एका आदरणीय व्यक्तीची कथा आहे, जी फ्लॅशबॅकमध्ये दाखवली गेली. हा तामिळ चित्रपट जानेवारी 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...