आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NCB च्या टीमवर मुंबईत हल्ला:ड्रग पेडलरच्या घरी छापा टाकायला गेलेल्या NCB च्या पथकावर 50-60 लोकांनी केला हल्ला, समीर वानखेडेसह तीन अधिकारी जखमी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या हल्ल्यात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे जखमी झाले आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थातच एनसीबीच्या पथकावर मुंबईतील गोरेगाव भागात हल्ला झाला आहे. यात 4 अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. ताज्या माहितीनुसार 50-60 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाचे दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.

एनसीबीचे एक पथक ड्रग पॅडलर कॅरी मँडिसला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. या पथकाने छापा टाकताच कॅरीच्या सहका-यांनी एनसीबीच्या पथकावर दगड आणि काठीने हल्ला चढवला. मात्र, एनसीबीच्या पथकाने शौर्य दाखवत कॅरीचे सहकारी विपुल आगरे, युसुफ शेख आणि अमीन अब्दुल यांना अटक केली आहे. अटक केलेल्या तीन आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.

हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांची अनेक पथके या भागात छापा टाकत आहेत. याक्षणी परिस्थिती नियंत्रणात आहे. चारही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 353 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser