आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी एक धक्का:वडिलांच्या निधनाच्या सहा दिवसांनी हिना खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, टीम हिनाने सोशल मीडियावर दिली माहिती

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याची केली अपील

अभिनेत्री हिना खानचे वडील असलम खान यांचे मागील मंगळवारी निधन झाले. कार्डियक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या निधनामुळे हिना खान आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. वडिलांच्या शेवटच्या क्षणी हिना त्यांच्याजवळ नव्हती. कामानिमित्ताने ती काश्मिरमध्ये होती. आता ती मुंबईत परतली आहे. वडिलांच्या निधनाच्या सहा दिवसांनी हिनाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हिनाच्या टीमने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे.

टेस्ट करुन घेण्याची केली अपील
हिनाच्या वतीने तिच्या टीमने लिहिले, 'सध्या मी आणि माझे कुटुंब कठीण परिस्थितीचा सामना करत असतानाच माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी होम क्वारंटाइन झाले असून सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांना विनंती करते की त्यांनी कोरोना चाचणी नक्की करून घ्यावी. तुमच्या आशिर्वादाची आवश्यकता आहे. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.'

टीम हँडल करणार हिनाचे सोशल अकाउंट
यापूर्वी हिना खानने एक पोस्ट शेअर करत यापुढे तिची टीम तिचे सोशल मीडिया अकाउंट हँडल करणार असल्याची माहिती दिली होती. हिना लिहिले होते, "माझे प्रिय वडील असलम खान 20 एप्रिल 2021 रोजी आपल्या सर्वांना सोडून गेले. या कठीण काळात माझ्या कुटुंबाच्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे. माझे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. म्हणून आता माझी टीम यापुढे माझे सोशल मीडिया अकाउंट हँडल करेल आणि माझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल आपल्याला वेळोवेळी अपडेट देत राहिल. तुमच्या प्रेम व पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद," असे हिनाने म्हटले होते. वडिलांच्या निधनानंतर हिनाची ही पहिली पोस्ट होती.

बातम्या आणखी आहेत...