आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय हा अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे जो वर्षाला जास्तीत जास्त चित्रपट करतो. अक्षयचे कोरोना काळानंतर बेल बॉटम, सूर्यवंशी, अतरंगी रे, सम्राट पृथ्वीराज सारखे चित्रपट आले आहेत, ज्यासाठी त्याने भरमसाठ फी आकारली आहे. यापैकी काही चित्रपट असे आहेत, ज्यासाठी अक्षयने चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिस कमाईपेक्षा जास्त मानधन घेतले. जाणून घेऊया अक्षयने कोणत्या चित्रपटांसाठी किती फी घेतली-
सम्राट पृथ्वीराज
अक्षय कुमार, मानुषी छिल्लर स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट 3 जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट 175 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. त्याने आतापर्यंत केवळ 84 कोटी रुपये कमावले आहेत. अक्षयने या चित्रपटासाठी 60 कोटी रुपये घेतले होते. या कमाईतून केवळ अक्षयची फी निघू शकली आहे.
बच्चन पांडे
18 मार्च 2022 रोजी रिलीज झालेला 'बच्चन पांडे' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. या चित्रपटाने केवळ 68 कोटींची कमाई केली होती, तर अक्षयने या चित्रपटासाठी तब्बल 99 कोटी रुपये घेतले होते. निर्मात्यांना या कलेक्शनमधून मुख्य अभिनेत्याची फी देखील काढता आली नाही. हा चित्रपट 180 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, यात अक्षयसोबत क्रिती सेनन, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट 'टशन'चे पात्र बच्चन पांडेची पूर्ण स्टोरी आहे.
अतरंगी रे
गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष स्टारर चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर डिजिटली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे हक्क 200 कोटींना विकले गेले होते, तर अक्षयने या चित्रपटासाठी 27 कोटी रुपये घेतले होते.
सूर्यवंशी
‘सूर्यवंशी’ हा चित्रपट कोरोना नंतरचा पहिला हिट चित्रपट होता. या चित्रपटाने 195 कोटींची कमाई केली होती. अक्षयने या चित्रपटासाठी केवळ 25 कोटी रुपये घेतले होते, परंतु कोविड नंतर प्रदर्शित झालेला हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.
बेल बॉटम
अक्षय कुमार, लारा दत्ता, हुमा कुरेशी स्टारर 'बेल बॉटम' हा चित्रपट 19 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज झाला, त्याची निर्मिती 70 कोटींच्या बजेटमध्ये झाली, तर अक्षयने त्यासाठी 117 कोटी रुपये आकारले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 50 कोटींचे कलेक्शन केले होते, ज्यातून अक्षयची फीही निघाली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.