आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • 67th National Film Awards Winners List ,Sushant Singh Rajput's 'Chhichore' Won Best Hindi Film, While Kangana Ranaut Won National Award For Best Actress For The Fourth Time.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा:सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे' ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, तर कंगना रनोटला चौथ्यांदा मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी पुरस्काराची घोषणा करता आली नव्हती

सोमवारी 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात 2019 मध्ये रिलीज चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे. यात नितेश तिवारी दिग्दर्शीत आणि दिवंगत सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर अभिनीत 'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला आहे. याशिवाय, अभिनेत्री कंगना रनोटला 'मणिकर्णिका' आणि 'पंगा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगनाचा हा करिअरमधील चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

यापूर्वी तिला 'फॅशन' (2008)साठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस, 'क्वीन' (2014) साठी बेस्ट अॅक्ट्रेस आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' (2015)साठी बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया

कॅटेगरीविजेताइतर
बेस्ट फीचर फिल्म (हिंदी)छिछोरेडायरेक्टर- नितेश तिवारी
बेस्ट अॅक्ट्रेसकंगना रनोटफिल्म- मणिकर्णिका, पंगा
बेस्ट अॅक्टरमनोज बाजपेयी, धनुष
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरविजय सेतुपती
बेस्ट सिंगरबी प्राकतेरी मिटटी- केसरी
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसपल्लवी जोशी
बेस्ट एडिटिंगजर्सी (तेलुगू)
बेस्ट ऑटोबायोग्राफीखासी
बेस्ट स्क्रीनप्ले अडॉप्टेडगुमनामी
बेस्ट सिनेमॅटोग्राफीजलीकट्टू
बेस्ट फीमेल सिंगरबार्दो
बेस्ट फिल्म क्रिटिकसोहिनी चट्टोपाध्याय
मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेटसिक्कीम
बेस्ट नॉन फीचर फिल्मवाइल्ड कर्नाटक
बेस्ट डायरेक्शनसंजय पूरण सिंह चौहानफिल्म- बहत्तर हूरें
बेस्ट चिल्ड्रेन फिल्मकस्तूरी (हिंदी)
बेस्ट डायलॉग्स राइटरद ताशकंद फाइल्स
बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्लेज्येष्ठोपुत्री
बेस्ट कोरियोग्राफीमहर्षि (तेलुगू)
बेस्ट स्टंटअवाने श्रीमाननारायण (कन्नड़)
बेस्ट बुक ऑन सिनेमाअ गांधियन अफेयर : इंडियाज क्युरियस पोर्ट्रेयल ऑफ लव इन सिनेमाऑथर- संजय सूरी
स्पेशल मेंशन अवॉर्ड (फिल्म)बिरयानी (मल्याळम), जोनाकी पोरुआ (असमी), लता भगवान कारे (मराठी), पिकासो (मराठी)
बेस्ट फिल्म ऑन एनवायरनमेंट कंसर्वेशनटर बुरिअल
इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू डायरेक्टरमथुकुत्टी ज़ेवियरहेलन
बेस्ट पॉपुलर फिल्म प्रोवाइडिंग होलसम एंटरटेनमेंमहर्षि (तेलुगू)
बेस्ट फिल्म ऑन नेशनल इंटीग्रेशनताजमहल (मराठी)
बेस्ट फिल्म ऑन सोशल इश्यूजआनंदी गोपाल (मराठी)
बेस्ट चाइल्ड आर्टिस्टनागा विशाल,फिल्म- केडी (तामिळ)

विविध भाषांमध्ये या चित्रपटांना मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

चित्रपटभाषा
पिंगारातूलू
केंजिरापनिया
अनुरूवडमिशिंग
लेवडूखासी
छोरियां छोरों से कम नहींहरियाणवी
भूरन दी मेजछत्तीसगडी
जर्सीतेलुगू
असुरनतामिळ
रब दा रेडियोपंजाबी
साला बुराड़ बदला और कलिया अतितुओड़िया फिल्म
इगीकोनामणिपुरी
कलानोत्तममलयालम
बारडोमराठी
काजरोकोंकणी
अक्षीकन्नड़
छिछोरेहिंदी
गुमनामीबंगाली
रोनुआ हू नेवर सरंडर्सअसामी

मागच्या वर्षी कोरोनामुळे राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली नव्हती. आज जाहीर झालेले पुरस्कार एक वर्ष उशीराने घोषित होत आहे. हे पुरस्कार केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून जाहीर होत असतात. तसेच, या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाते.

बातम्या आणखी आहेत...