आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'धमाका’ हिंदी सिनेमाच्या इतिहासातला पहिला चित्रपट आहे, ज्याचे शूटिंग फक्त 10 दिवसांतच झाले. हे कसे शक्य झाले, याचे कारण काय आहे. वाचा इनसाइड स्टोरी -
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'धमाका’ आहे, तो नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मंगळवारी त्याचे टीझर रिलीज झाले आहे, त्यात कार्तिक आणि त्याची सीनियर असलेली अमृता सुभाष दिसत आहे. चित्रपटाची कथा फक्त तीन तासांच्या एका घटनेवर आधारित आहे. कार्तिक यात एक न्यूज अँकर बनला आहे, त्याला कुणाचा तरी धमाका होणार असल्याचा फोन येतो. त्याचे करिअर धोक्यात असते, त्यामुळे तो त्या फोनची माहिती पोलिसांना देण्याएेवजी बातमीत सांगून टाकतो. त्यानंतर न्यूजरूममध्ये जो तणाव निर्माण होतो त्यावर हा चित्रपट आधारित आहे. सध्या तर यावर संपादन सुरू आहे. अजून याच्या रिलीज डेटविषयी कोणतीच घोषणा झालेली नाही.
व्हीएफएक्सच्या मदतीने 'धमाका’
चित्रपटात स्फोटाच्या दृश्यासाठी देखील निर्मात्यांना लोकेशन बदलण्याची गरज पडली नाही. वरळी लिंक खरं तर हॉटेल ताज लँड्सच्या मागे दिसते. निर्मात्यांनी ग्रीन स्क्रीन आणि व्हीएफएक्सच्या मदतीने विमानतळाच्या जवळच्या हॉटेलमधून शूटिंग केले. चित्रपटात कार्तिकच्या व्यतिरिक्त त्याची सीनियरच्या भूमिकेत अमृता सुभाष दिसणार आहे. यात मृणाल ठाकुरचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटात एकही गाणे नव्हते मात्र निर्माते आता एक गाणे टाकण्याचा विचार करत आहेत.
Main hoon #ArjunPathak
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) March 2, 2021
Jo bhi Kahunga Sach Kahunga 🙏🏻#Dhamaka 💥
Coming soon, only on Netflix 🔥@AmrutaSubhash @strictlyvikas @vishwajeetpradhan @RamKMadhvani @RonnieScrewvala @amita_madhvani @RSVPMovies @OfficialRMFilms @NetflixIndia pic.twitter.com/T6otI4TzHu
यामुळे झाले 10 दिवसांत शूटिंग शक्य
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.