आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटसृष्टीवर शोककळा:74 वर्षीय गायक एस.पी. बालासुब्रमण्यम यांचे निधन; लता मंगेशकर, अमित शाह, रितेश देशमुखसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक सेलिब्रिटींनी त्यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूडमध्ये सलमान खानला आपल्या आवाजाने लोकप्रिय करणारे आणि 90 च्या दशकात एकापेक्षा एक हीट गाणे देणारे जेष्ठ गायक एस.पी. बालासुब्रमण्यम यांचे आज निधन झाले आहे. मागील 5 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेरच 52 दिवसांपासून त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

अनेक सेलिब्रिटींनी त्यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेते कमल हासन, गृहमंत्री अमित शाह, अभिनेता रितेश देशमुख, ए.आर. रहमान यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लता मंगेशकर

रितेश देशमुख

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

धनुष

वेंकट प्रभू

राम चरण

ए.आर. रहमान

कमल हासन

हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे की, अन्नैया S.P.B दीर्घ काळ माझा आवाज राहिले. पुढील सात पिढ्यांच्या मनात ते राहतील.

बातम्या आणखी आहेत...