आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंस्टाग्राम:कोरोना वॉरियर्सचे आभार मानण्यासाठी 8 वर्षीय आराध्याने रेखाटले सुंदर चित्र, ऐश्वर्याने शेअर केले छायाचित्र 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरी राहा, सुरक्षित रहा अशा संदेशासह आराध्याने एक थँक्स नोट देखील लिहिली आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची लाडकी लेक आराध्याने लॉकडाऊनमध्ये कोरोना वॉरियर्सचे आभार व्यक्त करुन त्यांना धन्यवाद म्हटले आहे.  आराध्याने एक ड्रॉईंग तयार केले आहे जे तिची आई ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. ऐश्वर्याने लिहिले, 'माझ्या प्रिय आराध्याचे आभार आणि प्रेम.'

कोरोना वॉरियर्सचे मानले आभार : आराध्याने कोरोना वॉरियर्स म्हणजेच डॉक्टर, परिचारिका, सैनिक, सफाई कर्मचारी, पोलिस, शिक्षक आणि पत्रकार यांचे चित्र रेखाटले आहे. सोबतच घरी राहा, सुरक्षित रहा अशा संदेशासह तिने एक थँक्स नोट देखील लिहिली आहे. या चित्रात आराध्याने आपल्या आईवडिलांचा हात धरुन स्वत: ला उभे असल्याचे दाखवले आहे. तिने अभिषेकला यलो टी-शर्ट आणि जीन्समध्ये दाखवले आहे तर आईला पांढर्‍या ड्रेसमध्ये. आराध्याने स्वत: साठी गुलाबी रंगाचा ड्रेस निवडला आहे.  

चाहत्यांनी कौतुक केले: ऐश्वर्याने आराध्याने रेखाटलेल्या चित्राचे छायाचित्र शेअर केल्यानंतर चाहत्यांनी चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  या छायाचित्राला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, काय सुंदर चित्र आहे. आणखी एका यूजरने लिहिले, या कठीण काळात घरात राहिलेल्या सर्वांचे आभार. तुम्हीही सर्व हीरो आहात.

8 वर्षांची आहे आराध्या : आराध्याचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 रोजी झाला. ती 8 वर्षांची आहे. आराध्या मुंबईतील धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये शिकते. तिला चित्रकला, नृत्य, गाण्याची आवड आहे. 

बातम्या आणखी आहेत...