आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडचे ‘ब्रह्मास्त्र’:100 कोटींपेक्षा अधिक बजेटचे 80% चित्रपट यशस्वी, 25 पैकी 20 चित्रपट सुपरहिट!

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे 410 कोटींचे बजेट असलेला बॉलीवूडचा सर्वात महागडा चित्रपट “ब्रह्मास्त्र’ने शुक्रवारी पहिल्या दिवशी देशभरात ~43.5 कोटींची कमाई केली. कमाईमध्ये “ब्रह्मास्त्र’ने बाहुबली-2 (~41 कोटी) व आरआरआर (~20 कोटी) ला मागे टाकले आहे. “ब्रह्मास्त्र’चा जगभरातील गल्ला 75 कोटी रुपये होता. कोरोनानंतर पहिल्याच दिवशी एवढी मोठी कमाई करणारा हा पहिलाच िहंदी चित्रपट ठरला. 100 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक बजेटचे सुमारे 25 हिंदी चित्रपट आतापर्यंत आले आहेत. त्यापैकी 7 ब्लॉकबस्टर, 3 सुपरहिट आणि 10 हिट ठरले आहेत. 5 चित्रपट (ठग्ज ऑफ हिन्दुस्थान, 83, लालसिंह चड्‌ढा, जीरो, राधे) फ्लॉप झाले.

ओपनिंग-डे कलेक्शनमध्ये ब्रह्मास्त्र चौथ्या क्रमांकावर
{ ओपनिंग जोरदार करणाऱ्या चित्रपटांमध्ये ब्रह्मास्त्र (~‌43.5 कोटी) चौथा {वाॅर (५३ कोटी ) प्रथम ठग्ज ऑफ हिन्दुस्थान (५२ को.) द्वितीय व हॅपी न्यू इयर (४५ कोटी) तिसऱ्या स्थानावर आहे.

मोठ्या बजेटचे ७ चित्रपट ब्लॉकबस्टर व ३ सुपरहिट
{25 बिग बजेट चित्रपटांत 7 ब्लॉकबस्टर (पद्मावत, धूम 3, वाॅर, तान्हाजी, सुलतान, चेन्नई एक्स्प्रेस व गंगूबाई) ठरले. 585 कोटी कमाईसह पद्मावत अव्वल ठरला. {3 सुपरहिट (टायगर जिंदा है, हॅपी न्यू इयर, सूर्यवंशी) आणि १० हिट (प्रेम रतन धन..., बँग- बँग, दिलवाले, रेस 3, रा वन, बाजीराव मस्तानी, दबंग 3, एमएस धोनी..., संजू आणि भारत)

सलमान खान बिग बजेट चित्रपटांचा ‘सुलतान’
बिग बजेटच्या 25 हिंदी चित्रपटांमध्ये सलमान खानचे सर्वाधिक 7 (टायगर जिंदा है, प्रेम रतन धन पायो, रेस 3, सुलतान, दबंग 3, राधे आणि भारत) आहेत. यात ‘सुलतान’ ब्लॉकबस्टर, ‘टायगर जिंदा है’ सुपरहिट, राधे फ्लॉप, उर्वरित 4 हिट झाले.

बातम्या आणखी आहेत...