आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा24 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित झालेला '83' हा बहुप्रतिक्षित चित्रपट ठरला आहे. आता या चित्रपटाला OTT या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार डायरेक्टर कबीर खान करत आहे. एका मुलाखतीत त्यांनी यांसबंधी माहिती दिली आहे. सिनेमागृहात प्रदर्शित होण्याअगोदरच एका मोठ्या OTT ने ऑफर दिली होती. मात्र कबीर चित्रपटगृहात आपला चित्रपट प्रदर्शित करण्यावर ठाम होते.
'83' या चित्रपटातून जेवढी कमाई हवी होती, तितकी मिऴू शकलेली नाही. कारण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या आठवड्याभरानंतरच देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे दिल्लीत सिनेमागृहे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. त्याचा मोठा तोटा या चित्रपटाला झाला आहे.
एका मुलाखतीत चित्रपटाचे डायरेक्टर कबीर खान यांनी सांगितले की, "हा चित्रपट 18 महिन्यांपुर्वीच तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला आम्ही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करणार होतो. कारण हा चित्रपट मोठ्या पडद्यासाठीच तयार करण्यात आलेला आहे. मात्र 18 महिन्यांपुर्वी या सिनेमाला चित्रपटगृहात प्रदर्शित करने शक्य नव्हते कारण, त्यावेळी देशात कोरोनाचा हाहाकार होता. आता आम्ही 24 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित केले असून, त्या दिवशीपासून देशात कोरोनाचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुऴे दिल्लीत सर्वच चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहे."
कपिल देव यांनी केले सांत्वन
कबीर खान पुढे म्हणाले की, "हा चित्रपट कपिल देवच्या आयुष्यावर आहे. त्यांनी सांत्वन करत सांगितले आहे की, जेव्हा भारताने 1983 मध्ये विश्वकप जिंकला होता, तेव्हा आम्हाला पैसे मिळाले नाहीत. मात्र आमचा सन्मान करण्यात आला. आणि तुम्ही देखील त्याच पद्धतीने हा चित्रपट पैसेसाठी नव्हे तर सन्मान मिळवण्यासाठी बनवला आहे." असे म्हणत कपिल देवने कबीर खानचे सांत्वन केले.
निर्बंधात वाढ झाल्यास OTT चा पर्याय
आपल्या 83 या चित्रपटाला OTT वर प्रदर्शित करण्यावरुन कबीर खान म्हणाले की, "देशात कोरोनासंबंधीचे निर्बंध हळू-हळू लागू केले जात आहेत. त्यामुळे सिनेमागृहे देखील बंद केली जात आहेत. जर आणखी निर्बंध वाढले तर आम्ही हा चित्रपट OTT वर प्रदर्शित करू, "मी खूप आनंदी आहे की, लोक प्रिकॉशनसह थिएटरमध्ये चित्रपटाला पाहायला जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.