आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भावांच्या मृत्यूविषयी अनभिज्ञ आहेत ट्रॅजेडी किंग:97 वर्षीय दिलीप कुमार यांना भावाच्या निधनाची माहिती नाही, पत्नी सायरा म्हणाल्या - त्यांना त्रासदायक बातम्यांपासून दूर ठेवले आहे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 दिवसांत दिलीप कुमार यांच्या दोन्ही लहान भावांचे कोरोनामुळे निधन झाले.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 13 दिवसांत त्यांचे दोन्ही भाऊ हे जग कायमचे सोडून गेले. शोकांतिका म्हणजे दिलीप कुमार यांना त्यांच्या भावाच्या निधनाबद्दल माहित नाहीये. 97 वर्षीय दिलीप साहेबांचे वय बघता त्यांना अशा वेदनादायक बातम्यांमुळे खूप त्रास होऊ शकतो, असे त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामुळे ते अनेक दिवस रुग्णालयात होते, हे देखील त्यांना सांगण्यात आले नव्हते. कारण दिलीप साहेब बिग बींना खूप पसंत करतात.

  • पुतण्यांनी केले अंत्यसंस्कार

दिलीप साहेबांचे धाकटे भाऊ अहसान खान यांच्या अंत्य संस्काराबाबत सायरा बानो म्हणाल्या की, दिलीप साहेबांचे पुतणे इम्रान आणि अयूब यांनी त्यांना सुपुर्द -ए-खाक केले. सायरा म्हणाल्या की, आम्हाला वाटले होते की ते लवकरच बरे होतील, कारण 15 ऑगस्टपासून ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात होते. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी देखील स्थिर झाली होती, परंतु मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.

  • 21 ऑगस्ट रोजी असलम खान यांचे निधन झाले होते

13 दिवसांत दिलीप साहेबांचे दोन भाऊ हे जग कायमचे सोडून गेले. अहसान खान यांच्यापूर्वी म्हणजे 21 ऑगस्ट रोजी त्यांचे सर्वात लहान भाऊ असलम खान यांचे निधन झाले होते. ते 88 वर्षांचे होते. दोन्ही भावांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची ऑक्सिजनची पातळीही घसरली होती. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. अहसान खान आणि असलम खान त्यांची बहीण फरीदा (ज्या पूर्वी अमेरिकेत राहत होत्या) यांच्यासोबत राहत होते. त्यामुळे दिलीप कुमार आणि सायरा यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका नव्हता.