आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मजेदार अपील:गर्लफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी एका तरुणाने मागितली सोनू सूदकडे मदत, सोनूने दिली यापेक्षा एक चांगली आयडिया 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनूने या तरुणाला एक चांगली कल्पना दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत बनून आला आहे. या मजुरांना त्यांच्या गावी, त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याची व्यवस्था सोनू सूद करत आहे. या कामामुळे चर्चेत असलेल्या सोनूसाठी ट्विटरवर भन्नाट ट्विट केले जात आहेत. या चाहत्यांना तो मनमोकळेपणाने उत्तरेसुद्धा देत आहे. अलीकडेच एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी सोनूकडे मदत मागितली आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सोनूने या तरुणाला एक चांगली कल्पना दिली आहे.

एका यूजरने सोनू सूदला मदत मागताना ट्विट केले की, 'भाऊ, मलाही कोठेतरी सोडा. मैत्रिणींसोबत पळून जायचे आहे. आम्हाला अंदमान निकोबारला सोडा', असे या तरुणाने म्हटले. याला उत्तर म्हणून सोनूने तरुणाला एक चांगली कल्पना दिली आहे, सोनूने ट्विट केले, 'माझ्याकडे यापेक्षा एक चांगली कल्पना आहे. तुमच्या दोघांसोबत तुमच्या कुटुंबियांनाही पाठवतो. काय म्हणता? लगेच साखरपुडा आणि लग्न', असे सोनू त्या तरुणाला म्हणाला आहे. 

सोनूला अशी विचित्र मदत मागणारा हा पहिला तरुण नाहीये. यापूर्वीही अनेकांनी सोनूला भन्नाट ट्विट मिळाले आहेत. लॉकडाउनमध्ये पतीसोबत राहून कंटाळलेल्या एका महिलेने थेट अभिनेता सोनू सूदला टॅग करून ट्विटरवर विनंती केली होती. ‘एकतर माझ्या पतीला बाहेर पाठव किंवा मला तरी माहेरी पाठव’, असे त्या वैतागलेल्या महिलेने ट्विट केले होते.  यावर सोनू सूदने चांगलाच उपाय शोधून काढला होता. ‘माझ्याकडे चांगला प्लान आहे. तुम्हा दोघांना मी गोव्याला पाठवतो. काय म्हणता?’, असे उत्तर सोनू सूदने त्या महिलेला दिले होते.

बातम्या आणखी आहेत...