आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्टोरी ऑफ कक्कर:32 वर्षांची झाली नेहा कक्कर, वाढदिवसाच्या आदल्या दिवशी संघर्षमय प्रवास दाखवणारा व्हिडीओ केला शेअर

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहाचा आज वाढदिवस आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचा आज (6 जून) वाढदिवस असून तिने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी नेहाने आपल्या चाहत्यांंना तिचा संघर्षमय प्रवास एका व्हिडीओच्या माध्यमातून दाखवला. तिने या व्हिडीओला 'स्टोरी ऑफ कक्कर' असे नाव दिले, यात तिने आपल्या कुटुंबातील हलाखीच्या परिस्थितीपासून ते यशापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले आहे.

व्हिडीओची माहिती नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. या व्हिडीओसाठी नेहाचा भाऊ आणि गायक टोनी कक्करने रॅप साँग केले आहे. नेहाचा जन्म 1988 मध्ये झाला. त्यावेळी तिचे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत होते. तिचे आईवडील उदरनिर्वाहासाठी जगराता करायचे. नेहाची थोरली बहीण सोनू कुटुंबाच्या मदतीसाठी आईवडिलांसोबत जगरातामध्ये गात असे. त्यांना बघून नेहानेदेखील गाणं शिकली. नेहाचा गळा लहानपणापासूनच मधुर होता, यामुळे तिचे खूप कौतुक व्हायचे. 

हा व्हिडीओ टोनी कक्करच्या यूट्यूब पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यात जगराता करतानाची नेहाची अनेक छायाचित्रे आणि व्हिडीओ दिसतात. लवकरच यापुढची कहाणीदेखील दाखवली जाईल. त्यात नेहाचा दिल्ली ते मुंबईचा प्रवास दाखवला जाईल. 

'इंडियन आयडॉल 2' मधून मिळाली ओळख 

नेहाने इंडियन आयडॉल या सांगितिक रिअॅलिटी शोमधून आपली ओळख निर्माण केली. या शोची सर्वात लहान स्पर्धक नेहा लवकरच शोमधून बाहेर पडली. आणि नंतर याच शोची जज म्हणून ती झळकली. नेहाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांसाठी कोरसमध्ये गायन केले होते. नंतर तिला 'ना आना इस देश मेरी लाडो' या मालिकेचे शीर्षक गीत गाण्याची संधी मिळाली. येथून तिच्या करिअरला दिशा मिळाली.

एका खोलीच्या भाड्याच्या घरात गेले बालपण  

नेहा कक्करने मार्च महिन्यात ऋषिकेश येथे बंगला खरेदी केला. याच शहरातील एका भाड्याच्या खोलीत नेहाचे बालपण गेले होते. आपल्या इंस्टाग्रामवरून नेहोने तिच्या बंगल्याची आणि जुन्या घराची छायाचित्रे शेअर केली होती. तिने सांगितले की, या भाड्याच्या एका खोलीत जिथे तिची आई टेबल लावून त्याचा वापर किचनप्रमाणे करायची. जेव्हा या जुन्या घराला बघते तेव्हा खूप इमोशनल होते, असे नेहा म्हणाली. 

0