आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिराचा निर्णय:पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदीने सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो काढून टाकला, डीपीला ब्लॅक मार्क केला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 जून रोजी राज कौशल यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचे 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिराने तिचा सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो काढून टाकला आहे. त्याजागी आता तिने डीपीला ब्लॅक मार्क केला आहे. त्यामुळे आता फोटोच्या जागी आता तिथे काळा रंग दिसतोय. मंदिराने काहीच न बोलता अशा प्रकारे पतीच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे.

आशिष चौधरीने राज कौशलसाठी इमोशनल नोट लिहिली
जवळचा मित्र राज कौशल यांच्यासाठी अभिनेता आशीष चौधरीने एक भावूक नोट लिहिली आहे. आशीषने लिहिले, "राज नेहमी म्हणायचा की जेव्हा एखादा माणूस हे जग सोडून जातो तेव्हा तो आपला वारसा मागे ठेवतो. आणि माझ्यासाठी 'वारसा' या शब्दाचा अर्थ 'यश' आहे. आज राज आपल्यात नाही, पण तो आपल्यामागे आमच्यासाठी त्याचा प्रेमळ वारसा सोडून गेला आहे. राज नेहमी वारसाबद्दल बोलत असे. आता तो जगात नाही, तेव्हा मला तो म्हणत असलेल्या वारसा या शब्दाचा खरा अर्थ समजला आहे. माणसाचा वारसा फक्त त्याचे प्रेम आहे. फक्त मित्रांसाठी, कुटूंबासाठी नव्हे तर आपल्या आयुष्यात आपण भेटत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते प्रेम आहे," असे आशीष म्हणाला.

आशीष म्हणाला, एखादी व्यक्ती आपल्याबरोबर पैसे किंवा मालमत्ता सोबत घेऊन जात नाही

आशीषने पुढे लिहिले, "जेव्हा एखादा माणूस हे जग सोडून निघून जातो, तेव्हा तो पैसे किंवा मालमत्ता आपल्याबरोबर नेत नाही. उलट तो आपल्या आजूबाजूच्या लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद घेऊन जातो. आपण गेल्यानंतरच लोकांना आपली उणीव भासते. आणि ते आपली आठवण काढतात. माझ्या भावाने मागे सोडलेला हा वारसा आहे. प्रेमाचा वारसा."

दिग्दर्शक, निर्माता होते राज कौशल
मंदिरा बेदीचे पती राज कौशल हे एक दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी 'प्यार में कभी-कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय त्यांनी 'माय ब्रदर निखिल', 'शादी का लड्डू' आणि 'प्यार में कभी-कभी' या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. जाहिरात विश्वातही राज यांचे मोठे नाव होते. बुधवारी पहाटे साडे चार वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी मंदिराने त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट 1990 मध्ये मुकूल आनंद यांच्या घरी झाली होती. त्यावेळी राज आनंद यांचे चीफ असिस्टंट होते. दोघांनी नऊ वर्षे डेटिंग केल्यानंतर 1999 मध्ये लग्न केले होते. असे म्हटले जाते की मंदिरा आणि राज यांच्या लग्नामुळे त्यांचे कुटुंबिय फारसे आनंदी नव्हते. मंदिरा आणि राज यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुलगी ताराला दत्तक घेतले होते. त्यांना एक मुलगा असून वीर त्याचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...