आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरुण धवन आणि सारा अली खान स्टारर 'कुली नंबर 1' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाची बेकायदेशीररित्या थिएटर रिलीजची तयारी सुरु असल्याचा आरोप भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय सरोज यांनी केला आहे. वृत्तानुसार, नाशिक येथील साई समर्थ टॉकीजने हा चित्रपट चुकीच्या पद्धतीने डाऊनलोड केला असून पायरेटेड प्रत सिनेमागृहात दाखविण्याची योजना आखली जात होती.
झूमच्या वृत्तानुसार विजय सरोज म्हणाले की, थिएटर चित्रपटाचे पोस्टर्स शेअर करत आहे. या तक्रारीनंतर फिल्म ट्रेड युनियनने पोलिसांत तक्रार केली असून हे कॉपीराइट कायदा 1957 चे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'कुली नंबर 1' या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहे. गोविंदाच्या गाजलेल्या 1995 च्या 'कुली नंबर 1' चा हा रिमेक आहे. या चित्रपटात गोविंदाशिवाय करिश्मा कपूर, कादर खान आणि शक्ती कपूर यांनी अभिनय केला होता.
सारा-वरुणचा चित्रपट 25 डिसेंबर रोजी ऑनलाइन होणार प्रदर्शित
25 डिसेंबरला ख्रिसमसच्या निमित्ताने अॅमेझॉन प्राइमवर कुली नंबर 1 रिलीज होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटातील गाणी रिलीज करण्यात आली आहे. सर्व टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. वरुण आणि सारा व्यतिरिक्त या चित्रपटात राजपाल यादव आणि परेश रावल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय जावेद जाफरी, जॉनी लिव्हर, शिखा तलसानिया हेदेखील चित्रपटात दिसणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.