आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या निधनानंतर परीक्षेत नापास होऊ लागले होते रहमान:मुख्याध्यापक आईला म्हणाले होते - या मुलाला घेऊन रस्त्यावर भीक मागा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

2 ऑस्कर, 2 ग्रॅमी आणि डझनभर पुरस्कार आपल्या नावी करणारे गायक आणि संगीतकार ए.आर. रहमान आज 56 वर्षांचे झाले आहेत. आपल्या कौशल्याने जगभरात नाव कमावणाऱ्या ए. आर. रहमान यांचे बालपण अत्यंत गरीबीत गेले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावले. वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. जबाबदाऱ्या एवढ्या होत्या की, त्यांना लहान वयातच शिक्षण सोडावे लागले. एक काळ असा होता की, ए. आर. रहमान यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. नाईलाजाने सुरू झालेला सांगीतिक प्रवास त्यांना यशोशिखरावर घेऊन गेला. आज ए. आर. रहमान हे भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि गायकांपैकी एक आहेत.

आज ए. आर. रहमान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे बालपण, संघर्ष आणि यशाशी संबंधित काही रंजक गोष्टी वाचा-

वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांनी पियानो वाजवायला शिकवले होते
एक आर. रहमान यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. त्यांचे वडील आर.के. शेखर हे चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून कार्यरत होते. वडिलांनी रहमान यांना वयाच्या चौथ्या वर्षी पियानो वाजवायला शिकवले होते. रहमान ९ वर्षांचे असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाला गरिबीचा सामना करावा लागला. घर चालवण्यासाठी रहमान यांची आई वडिलांची वाद्ये भाड्याने देत असे. रहमान यांना ती वाद्ये कशी वाजवायची हे माहीत असल्यामुळे त्यांनाही सोबत जावे लागत असे. त्यांची पहिली कमाई म्हणून 50 रुपये होती.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी आईला म्हटले होचे - रस्त्यावर भीक मागा
घराची जबाबदारी खांद्यावर पडल्याने रहमान यांचे हळूहळू अभ्यासातून लक्ष दूर होऊ लागले. त्यांची शाळेतील उपस्थिती कमी होत गेली आणि ते परीक्षेत नापास होऊ लागले. 2012 मध्ये दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रहमान यांनी सांगितले की, परीक्षेत नापास झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी आईला भेटायला बोलावले आणि तक्रार केली. आईने तिची आर्थिक अडचण सांगितल्यावर मुख्याध्यापकांनी तिला म्हटले की, या मुलाला पुन्हा शाळेत पाठवू नकोस आणि रस्त्यावर जाऊन भीक मागा.

लहान वयातच शिक्षण सोडले
मुख्याध्यापकांनी अपमानित केल्यानंतर ए. आर. रहमान यांनी ती शाळा सोडली आणि एम. सी. एन. शाळेत प्रवेश घेतला, जिथे त्यांनी एक लहान बँड देखील तयार केला. रहमान यांना संगीत आणि अभ्यास यांच्यात समतोल साधणे कठीण जात होते, त्यामुळे आईचा सल्ला घेऊन त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी शिक्षण सोडले.

वयाच्या 20 व्या वर्षी धर्म आणि नाव बदलले

एक आर. रहमान यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. दिलीप कुमार हे त्यांचे खरे नाव आहे. रहमान यांनी वयाच्या 20 व्या वर्षी आपले नाव आणि धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या आईचा इस्लामचा असलेला प्रभाव. वयाच्या 20 व्या वर्षी इस्लाम स्वीकारल्यानंतर दिलीप कुमार यांनी स्वतःचे नाव ए. आर. रहमान ठेवले.

ए. आर. रहमान यांना त्यांच्या जुन्या नावाचा तिरस्कार वाटायचा
दिलीप हे नाव रहमान यांना त्यांच्या वेदनादायक भूतकाळातील दिवसांची आठवण करून देते, त्यामुळे त्यांना ते नाव आवडत नाही. जेव्हा ए. आर. रहमान यांची बायोग्राफी लिहिली जात होती, तेव्हा त्यांनी स्वतः लेखकाला संपूर्ण पुस्तकात फक्त एकदाच दिलीप नावाचा उल्लेख करुन इतर ठिकाणी ए. आर. रहमान हेच नाव वापरण्यास सांगितले होते.

वयाच्या 25 व्या वर्षी येत होता आत्महत्येचा विचार
वयाच्या 25 व्या वर्षी संगीताशी संबंधित लहानमोठी कामे करत असताना रहमान आपल्या आयुष्याबद्दल खूप निराश झाले होते. त्यांच्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार येत होता. मात्र, यादरम्यान त्यांनी त्यांच्या घराच्या अंगणात एक छोटासा रेकॉर्डिंग स्टुडिओ बांधला आणि इथूनच त्यांचा यशाचा प्रवास सुरू झाला.

मणिरत्नम यांची नजर पडताच मिळाला पहिला चित्रपट
कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अनेक माहितीपटांना संगीत दिले. पुढे त्यांनी अनेक जाहिराती आणि जिंगल्सही केल्या. एकदा रहमान यांनी टायटनसाठी बनवलेल्या एका जिंगलने दक्षिणेतील चित्रपट निर्माते मणिरत्नम यांचे लक्ष वेधून घेतले. मणिरत्नम यांना रहमान यांचे काम इतके आवडले की, त्यांनी त्यांना 'रोजा' चित्रपटाची ऑफर दिली.

1992 मध्ये फिल्मी दुनियेत ठेवले पाऊल
'रोजा' या तमिळ चित्रपटाद्वारे ए. आर. रहमान यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर, 1992 मध्ये सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी रहमान यांना त्यांच्या दुसऱ्या चित्रपटासाठी साइन केले. बॉलिवूडमध्ये संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 'रंगीला' होता. या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

1995 मध्ये आलेल्या 'रंगीला'द्वारे सुरू झाला हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रवास
'रंगीला' हा रहमान यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट. या चित्रपटात त्यांनी आमिर खान, उर्मिला मातोंडकर, शेफाली शाह आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांसोबत काम केले होते. यानंतर रहमान यांनी ताल, लगान, वन टू का फोर, साथिया, युवा, स्वदेश, रंग दे बसंती, रावण, स्वदेश आणि रॉकस्टार या चित्रपटांसाठी काम केले.

वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी त्यांच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान असलेल्या सायराशी केले लग्न

1995 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी ए. आर. रहमान यांनी सायरासोबत अरेंज मॅरेज केले होते. लग्नाच्या वेळी सायरा 21 वर्षांची होती. या दाम्पत्याला तीन मुले झाली.

इंग्रजी चित्रपटांमध्येही केले आहे काम
'एलिझाबेथ - द गोल्डन एज' ​​हा रहमान यांचा पहिला हॉलिवूड चित्रपट होता. यानंतर त्यांनी 'स्लमडॉग मिलेनियर', 'कपल्स रिट्रीट', '127 आर्स', 'पीपल लाइक अस' आणि 'पेले' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

रहमान यांनी 2019 मध्ये 'अॅव्हेंजर्स: एंडगेम'साठी हिंदी, तामिळ आणि तेलुगुमध्ये 'मार्वल अँथम' तयार केले होते. यासाठी त्यांनी मार्वलसोबत पार्टनरशिप केली होती. रहमान यांनी हा ट्रॅक रॅपसोबत गायला आणि संगीतबद्ध केला होता.

2019 मध्ये सुरू झालेल्या 'द व्हॉईस' या सांगितिक कार्यक्रमात रहमान जज म्हणूनही दिसले आहेत. याशिवाय त्यांनी भारतातील पहिले यूट्युब ओरिजिनल ARRived लाँच केले.

निर्माता म्हणूनही केले आहे काम
निर्माता म्हणून ए. आर. रहमान यांचा पहिला चित्रपट 2019 मधील '99 साँग्स' हाहोता. 99 साँग हा ए. आर. रहमान दिग्दर्शित म्युझिकल रोमान्स चित्रपट आहे. रहमान यांनी स्वतः याचे लेखन आणि निर्मिती केली. डॉल्बी अॅटमॉस तंत्रज्ञानाचा वापर करणारा हा पहिला भारतीय साउंडट्रॅक अल्बम आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटाचा संगीत अल्बम बनवणारे रहमान पहिले भारतीय कलाकार ठरले आहेत.

वादाशी आहे रेहमान यांचे नाते
2022 मध्ये गृहमंत्री अमित शहांनी इंग्रजीचा पर्याय म्हणून हिंदी भाषेचा वापर करा, असे म्हटले होते. या मुद्द्यावर ए. आर. रहमान यांनी तामिळ भाषेचे महत्त्व आणि तामिल लोकांसाठी त्याची ओळख दर्शवणारे बॅनर ट्विट केले होते. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते की – 'तामिळ बोलणे हा आमचा अधिकार आहे.' रहमान यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अल्पावधीतच 13 हजारांहून अधिक लोकांनी याला रिट्वीट केले होते.

ए. आर. रहमान यांना 130 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे
ए. आर. रहमान यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी 2 ऑस्कर पुरस्कार, 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 फिल्मफेअर पुरस्कार, 17 फिल्मफेअर साउथ पुरस्कार आणि 2 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय 2010 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांना आतापर्यंत एकूण 138 पुरस्कार मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...