आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शकांसोबत बातचीत:गोविंदा स्टारर ‘साजन चले ससुराल’चा रिमेक लवकरच येणार, दिग्दर्शक राजीव रुइया म्हणाले...

ज्योती शर्माएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोविंदाचे पात्र वरुण धवन करत आहे.

‘माय फ्रेंड गणेशा’ फ्रँचायझीचे दिग्दर्शक राजीव एस. रुइया हे यंदा याच्या पाचव्या पार्टवर काम करत आहेत. तसेच ते ‘साजन चले ससुराल’ च्या रिमेकवरही काम करत आहेत. त्यांच्याशी खास बातचीत....

सध्या तुम्ही कोणत्या चित्रपटात व्यग्र आहात?
यावेळी माझे दोन चित्रपट निर्मितीचे काम सुरू आहे. ‘माय फ्रेंड गणेशा’ चा पाचावा पार्ट येत आहे. त्याबरोबरच ‘साजन चले ससुराल का’चा रिमेकही बनवत आहे. अजूनपर्यंत आम्ही पात्र निश्चिती केलेली नाही. स्क्रिप्टवरच सध्या काम सुरू आहे. तसेच अजून आमच्यात अजून काहीच ठरलेले नाही. गोविंदाचे पात्र वरुण धवन करत आहे. परंतु तेदेखील निर्मात्यावर अवलंबून आहे. गोविंदाचे पात्र करण्यासाठी कुणाशी संपर्क करावा? चित्रपटासाठी किती भांडवल लागेल? हे देखील अजून निश्चित केलेले नाही. तूर्त आम्ही केवळ एक कथा तयार करत आहोत.

आम्ही आपणास बहुतांशवेळा अॅनिमेटेड चित्रपटांसह जोडलेले पाहिले आहे. यामागे काही खास कारण आहे का?
आमच्या अॅनिमेटेड चित्रपटात परिपूर्ण कंपोजिट अॅनिमेशन असते. ज्यात लाइव कॅरेक्टरही होते. मी जुही चावलासाठी एक चित्रपट बनवला होता. ज्यात जुहीसोबत कतरीनाही होती. तसेच जेव्हा मी म्युजिक इंडस्ट्रीत आलो, तो केवळ एडिटर म्हणून. तेव्हा मी 80 हून अधिक म्युजिक व्हिडिओ संपादित केले होते. या सर्व 18 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर संगीत माझा छंदच बनला. बाकी अॅनिमेटेड चित्रपटांवर तर काम चालूच असते.

तुम्ही अर्जुन रामपालसोबतही चित्रपटावर काम करत आहात, त्याबद्दलही काय सांगाल?
'जाको राखे साइयां’ हा सत्य कथेवर आधारित आहे. चित्रपटात अर्जुनची पोलिसाची भूमिका आहे. कथा अशी आहे, ज्याच्या एनकाउंटरचा प्लान असतो, तो वाचतो.

बातम्या आणखी आहेत...