आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • A Team Is Reaching Mumbai From Lucknow For Investigation In A Case Of Cheating, Can Interrogate The Actress Shilpa Shetti And Her Mother

शिल्पाची कंपनी वादात:फसवणूक प्रकरणी शिल्पा आणि तिच्या आईची चौकशी करु शकतात UP पोलिस, लखनौहून मुंबईत दाखल होत आहे पोलिसांचे पथक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांनी लखनौच्या विभूतीखंड परिसरात आयओसिस स्लिमिंग स्किन सलून आणि स्पा या नावाने कंपनीची फ्रेंचाइजी उघडली होती.

राज कुंद्रानंतर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांनाही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. लखनौमध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी लखनौ पोलिसांची एक टीम मुंबईला रवाना झाली आहे. ती आज संध्याकाळपर्यंत मुंबईत दाखल होईल. येथे पोलिसांचे पथक शिल्पा आणि तिची आई सुनंदा यांची चौकशी करू शकते.

'आयओसिस स्लिमिंग स्किन सलून आणि स्पा वेलनेस सेंटर'ची शाखा उघडण्याच्या नावाखाली शिल्पा शेट्टी आणि सुनंदा शेट्टीच्या कंपनीतील लोकांनी दोन लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पैसे घेतल्यानंतरही शिल्पा आणि तिच्या आईने आपले कमिटमेंट पूर्ण केले नाही. शिल्पा सेंटरच्या ब्रांच ओपनिंगलाही पोहोचली नाही आणि तिच्या कंपनीच्या लोकांनीही मदत केली नाही, असा आरोप शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर आहे.

लखनौमध्ये 2 गुन्हे दाखल झाले
या प्रकरणी लखनौच्या विभूतीखंड पोलिस ठाण्यात ओमेक्स हाइट्सच्या रहिवासी ज्योत्स्ना चौहान आणि हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये रोहित वीर सिंह यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणांच्या तपासात शिल्पा आणि तिची आई सुनंदा यांची भूमिका असल्याचे समोर आले आहे. हजरतगंज पोलिसांनी दोघींनाही एक महिन्यापूर्वी चौकशीसाठी समन्स बजावले होते. या प्रकरणात विभूतीखंड पोलिसांची टीम नोटीसच्या अंमलबजावणीसाठी मुंबईत पोहोचत आहे. डीसीपी पूर्वी यांचे विशेष पथक स्वतंत्र चौकशीठी मुंबईत पोहोचले आहे.

पीडितेने शिल्पाच्या कंपनीवर अडीच कोटी रुपये उकळल्याचा आरोप केला
ज्योत्स्ना चौहान यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये ही तक्रार नोंदवली होती. तक्रारीत त्यांनी आरोप केला आहे की, वेलनेस सेंटर उघडण्याच्या नावाखाली आयोसिस कंपनीचे किरण वावा, विनय भसीन, अनिका चतुर्वेदी, इश्राफिल, नवनीत कौर, आशा, पूनम झा यांच्यासह अनेक लोकांनी दोन वेळा अडीच कोटी रुपये त्यांच्याकडून घेतले होते. सेंटर उघडण्यासाठी कंपनीच्या लोकांनीच सामान पाठवले होते. त्या बदल्यात त्यांच्याकडून हे पैसे घेण्यात आले होते. यासाठी अनेक बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप चौहान यांनी केला आहे. सेंटरच्या उद्घाटनाला सेलिब्रिटींची उपस्थिती असेल असे सांगण्यात आले होते. मात्र उद्घाटनाच्या काही वेळापूर्वीच त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप आहे.

पुरावे मिळाल्यानंतर अटक होऊ शकते
डीसीपी पूर्वी संजीव सुमन स्वतः या हायप्रोफाईल प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. ते म्हणतात की, हे प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल आणि संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा प्रत्येक कोनातून तपास केला जात असून पुरावे गोळा केल्यानंतर आरोपींना अटकही होऊ शकते.

दुसऱ्या प्रकरणात रोहित वीर सिंग यांनी हजरतगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांना तपासादरम्यान एक महिन्यापूर्वी त्यांचे बयान नोंदवण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, दोघांनीही त्यांचे जबाब नोंदवले नाहीत. लवकरच हजरतगंज पोलिसही मुंबईत जाऊन दोघींचेही जबाब नोंदवू शकतात.

मड आयलंड स्थित या भाड्याच्या बंगल्यात राज कुंद्राच्या सांगण्यावरुन पॉर्न चित्रपटांचे चित्रीकरण केले जायचे, असा आरोप आहे.
मड आयलंड स्थित या भाड्याच्या बंगल्यात राज कुंद्राच्या सांगण्यावरुन पॉर्न चित्रपटांचे चित्रीकरण केले जायचे, असा आरोप आहे.

न्यायालयीन कोठडीत आहे शिल्पाचा नवरा
तत्पूर्वी, 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी शिल्पाचा नवरा आणि उद्याजक राज कुंद्राला सॉफ्टपॉर्न चित्रपट बनवणे आणि ते प्रसारित केल्याबद्दल अटक केली होती. कुंद्रा 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुंद्रासह 11 जणांना अटक केली आहे. शिल्पा शेट्टीचीही गुन्हे शाखेच्या टीमने 6 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली होती. या प्रकरणात, कुंद्राच्या दोन याचिका उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मात्र, शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...