आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:अहान शेट्टी म्हणाला- 'तडप'साठी मला 11 किलो वजन वाढवावे लागले, म्हणून मी एका दिवसात 11 ते 12 वेळा जेवायचो

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा 'तडप' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एका मुलाखतीदरम्यान अहानने खुलासा केला की, 'तडप'साठी त्याला 11 किलो वजन वाढवावे लागले. वजन वाढवण्यासाठी दिवसातून 11 ते 12 जेवावे लागत असे, असेही त्याने सांगितले. या चित्रपटात अहानसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटासाठी घेतलेली फिजिकल ट्रेनिंग कठीण होती
अहान म्हणाला, "चित्रपटासाठी फिजिकल ट्रेनिंग घेणे माझ्यासाठी कठीण काम होते. कारण या चित्रपटासाठी मला 11 किलो वजन वाढवावे लागले. मला ते करणे खूप कठीण वाटले. याकाळात मला हवे ते खाणे शक्य झाले. एका दिवसात 11 ते 12 वेळा मी जेवायचो."

दिग्दर्शकाला अहानला चित्रपटात बॉडीमध्ये पाहायचे होते
अहानने पुढे सांगितले, "कधीकधी मी दुपारी जेवण करत असायचो आणि तोपर्यंत माझे पुढचे जेवणही सेटवर पोहोचायचे. ते करणे माझ्यासाठी खूप अवघड होते. मिलन सरांना त्या व्यक्तिरेखेसाठी खूप चांगली शरीरयष्टी असलेली व्यक्ती हवी होती," असे अहान म्हणाला. 'तडप' हा तेलुगू चित्रपट 'RX 100' चा अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये कार्तिकेय गुम्माकोंडा मुख्य भूमिकेत होता.

अहान त्याच्या पहिल्या चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारत आहे, तर तारा या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ प्रस्तुत आणि सह-निर्मिती, नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट प्रॉडक्शनचा 'तडप' हा चित्रपट साजिद नाडियाडवाला निर्मित आहे. मिलन लुथरिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...