आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग प्रोजेक्ट:मधुर भांडारकरांच्या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत दिसणार आहना कुमरा, जाणून घ्या या चित्रपटाविषयी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. 'इंडिया लॉकडाउन' असे या चित्रपटाचे नाव असून अभिनेत्री आहना कुमरा यात पायलटची भूमिका वठवणार आहे. वृत्तानुसार, चित्रपटाची कथा ही एका महिला पायलटवर आधारित असू जी लॉकडाउनमुळे घरातच अडकते. या चित्रपटात पायलटच्या आयुष्यातील भावनात्म उलथापालथ दाखवण्यात येणार आहे. आहनाने सांगितल्यानुसार, ती मधुर भांडारकर यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले असून चित्रपटाचा मुहूर्तही संपन्न झाला आहे. मुंबईत चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटात आहनासह मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सई पुन्हा एकदा हिंदी सिनेमात दिसणार आहे.

या चित्रपटात सई ताम्हणकर आणि आहनासह प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी मुख्य भूमिकेत दिसतील.