आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन:आमिरने अत्यावश्यक सेवा देणा-या लोकांचे मनले आभार, म्हणाला - त्यांचे काम कौतुकास्पद 

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आमिरने गुप्त देणगी आहे.

अभिनेता आमिर खानने कोरोनाव्हायरसविरुद्ध युद्ध लढणार्‍या सर्वांचे आभार मानले आहेत. त्याने शुक्रवारी उशिरा रात्री आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “संकटाच्या या काळात डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र व्यवस्थापन, महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेल्या सेवांमध्ये व्यस्त असलेले बीएमसीचे सर्व लोक यांच्या कार्याचे कौतुक करतो.'' 

  • पीएम केयर्स फंडमध्येही आमिरने दिली गुप्त देणगी

आमिरच्या जवळच्या सूत्रांनुसार, लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आमिरने पीएम केयर्स फंड, महाराष्ट्रातील सीएम रिलीफ फंड, फिल्म वर्कर्स असोसिएशन आणि काही स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत पाठविली आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटासाठी काम करणा-या दैनंदिन मजुरांनाही मदत केली आहे. आमिरला त्याने दिलेल्या देणगीची पब्लिसिटी करायची नाही, त्यामुळे त्याने दिलेल्या मदतीची फारशी माहिती समोर आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...