आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:आमिरने केले गुप्त दान, अर्जुन डेटच्या माध्यमातून करणार मदत; कोरोना व्हायरसच्या या लढाईत सेलिब्रिटिजचा हातभार

बॉलिवूड डेस्क3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘लाल सिंह चड्डा’च्या सेटवरील रोजंदारी मजुरांना आमिरने केले सहकार्य

आमीरने पीडितांची मदत केली असून किती आर्थिक मदत केली याचा खुलासा केला नाही. आमिरच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, मुख्यमंत्री मदत निधी, फिल्म वर्कर्स असोसिएशनसह त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्डा’चित्रपटाच्या सेटवरील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना सहकार्य केले आहे. 

चाहत्यांसोबत व्हर्चुअल डेटवर जाऊन रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची अर्जुन करणार मदत

अभिनेता अर्जुन कपूरनेदखील मदतीचा हात पुढे केला आहे, परंतु त्याचा मदत करण्याचा अंदाज जरा हटके आहे. अर्जुनने आपल्या चाहत्यांना व्हर्च्युअल डेटवर जाण्याची संधी दिली अाहे आिण या माध्यमातून तो निधी जमा करणार आहे. अर्जुनने त्याची बहीण अंशुला कपूरसोबत मिळून एक फॅन काइंड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची मदत करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...