आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लाल सिंग चड्ढा'च्या व्यवसायात 10% घसरण:चित्रपटाने पाच दिवसांत कमावले 45 कोटी, साऊथच्या 'कार्तिकेय-2'च्या कलेक्शनमध्ये जबरदस्त तेजी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' या दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी घट झाली आहे. 'लाल सिंग चड्ढा'च्या कमाईत 30% आणि 'रक्षा बंधना'च्या कमाईत 10% घट झाली आहे. दुसरीकडे, दक्षिणेच्या 'कार्तिकेय 2' या चित्रपटाच्या हिंदी बेल्टमधील व्यवसायात जबरदस्त तेजी बघायला मिळाली आहे.

'लाल सिंग चड्ढा'ने पहिल्या वीकेंडमध्ये केली 45 कोटींची कमाई
वृत्तानुसार, 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'लाल सिंह चड्ढा'ने पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी 7.87 कोटींचा व्यवसाय केला आहे. याआधी या चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 10.5 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी (शनिवारी) 8.75 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) 7.26 कोटी रुपये आणि पहिल्या दिवशी (गुरुवारी) 11.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानुसार, चित्रपटाने आतापर्यंत पहिल्या वीकेंडमध्ये म्हणजेच चार दिवसांत भारतातून 45.83 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

पाच दिवसांत 'रक्षा बंधन'ने केली 34 कोटींची कमाई
दुसरीकडे, 70 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'रक्षा बंधन'ने पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी 6.31 कोटींचा व्यवसाय केला आहे. याआधी या चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 8.25 कोटी, तिसऱ्या दिवशी (शनिवारी) 7 कोटी, दुसऱ्या दिवशी (शुक्रवार) 6.4 कोटी आणि पहिल्या दिवशी (गुरुवारी) 8.2 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानुसार, चित्रपटाने आतापर्यंत पहिल्या वीकेंडमध्ये म्हणजेच चार दिवसांत भारतातून बॉक्स ऑफिसवर 34.47 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

साऊथच्या 'कार्तिकेय-2' या चित्रपटाने घेतली झेप
व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या रिपोर्टनुसार, निखिल सिद्धार्थच्या 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'कार्तिकेय 2' ने हिंदी पट्ट्यातील व्यवसायात 292% कोटींची झेप घेतली आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 1.10 कोटींचा व्यवसाय केला आहे. यापूर्वी शनिवारी 7 लाख आणि रविवारी 28 लाखांचा व्यवसाय केला होता. त्यानुसार या चित्रपटाने केवळ हिंदी पट्ट्यातच 1.45 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

आमिर-अक्षयच्या चित्रपटांच्या हिट आणि फ्लॉपचे हे आहे निकष
व्यापार विश्लेषकांच्या मते, जर 'लाल सिंग चड्ढा'ने 180 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला तर हा चित्रपट हिट मानला जाईल. दुसरीकडे, 'रक्षा बंधन'ला हिट ठरण्यासाठी 125 कोटींचा ऑल टाईम बिझनेस करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...