आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये अंत्यसंस्कार:असिस्टंट अमोस यांना आमिरने पत्नी किरणसोबत दिला अखेरचा निरोप, कुटुंबीयांचे केले सांत्वन 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्मशानभूमीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत.

अभिनेता आमिर खान सध्या शोकाकूल आहे. अलीकडेच त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे.  गेले 25 वर्षे आमिरचा असिस्टंट म्हणून काम करणा-या अमोस यांचे निधन झाले आहे. अमोस पॉल नादर यांच्यावर बुधवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊन असूनही, आमिर पत्नी किरण रावसोबत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आला होता. यावेळी त्याने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावला होता आणि स्मशानभूमीत जाण्यापूर्वी आणि बाहेर पडल्यानंतर हात स्वच्छ केले.

आमिरने कुटुंबीयांचे केले सांत्वन

स्मशानभूमीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये आमिर अमोस यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करताना दिसला. एका फोटोमध्ये तो अमोस यांच्या पार्थिवासमोर उभा राहून प्रार्थना करतानाही दिसला. 

25 वर्षांपासून आमिरचे असिस्टंट होते अमोस 

अमोस हे 25 वर्षांपासून आमिरसोबत काम करत होते. ते आमिरसोबत त्याच्या घरीच राहात होते. मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ते बेशुद्ध झाले. त्यानंतर आमिर आणि त्याची पत्नी किरण यांनी त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र अखेर वयाच्या 60 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमोस यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी, दोन मुले आणि सुना असा परिवार आहे. 

फाइल फोटो - अमोससोबत आमिर खान
फाइल फोटो - अमोससोबत आमिर खान

‘लगान’ चित्रपटात आमिरसोबत झळकलेल्या अभिनेता करीम हाजी यांनी अमोसच्या निधनाची माहिती दिली होती.  ते म्हणाले होते, 'अमोस हे अत्यंत साधे आणि सरळ व्यक्ती होते. त्यांना कोणता आजारही नव्हता. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. तसेच जवळची व्यक्ती गमावल्यामुळे किरण आणि आमिर दोघेही प्रचंड दु:खी आहेत.' अमोस यांनी आमिरपूर्वी राणी मुखर्जीसाठी काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...