आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी झाली होती आमिर-किरणच्या नात्याची सुरुवात:'लगान'च्या सेटवर पहिली भेट, फोन कॉलद्वारे सुरु झाली होती डेटिंग, दीड वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर 2005 मध्ये केले होते लग्न

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघांची भेट 'लगान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव लग्नाच्या 15 वर्षानंतर विभक्त झाले आहेत. किरण राव आणि आमिर यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. 28 डिसेंबर 2005 रोजी या दोघांचे लग्न झाले. आमिर आणि किरण दोघांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत यासंंबंधीची माहिती दिली. दोघांची भेट 'लगान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटात किरणने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. स्वत: आमिरने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे आणि किरणचे प्रेम लव्ह अॅट फर्स्ट साइट नव्हते. आमिरसाठी किरण केवळ फिल्म युनिटमधील एक सदस्य होती. आमिरने किरणशी काही खास ओळख नसल्याचे म्हटले होते. मैत्री ठीक आहे, पण कामाव्यतिरिक्त त्याचे किरणशी बोलणे नसायचे.

ऑक्टोबर 2001 मध्ये आमिरने त्याची पहिली पत्नी रीनापासून घटस्फोट घेतला होता. यानंतर त्याचे किरणसोबत संभाषण सुरू झाले होते. त्यावेळी आमिरला लग्न मोडल्यामुळे मोठा धक्का बसला होता. आमिरने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'एकदा किरणने त्याला फोन केला आणि दोघांमधील सुमारे अर्धा तास संवाद झाला. किरणशी झालेल्या संभाषणानंतर मी खूप आनंदी झालो. मी माझ्या आतला आनंद अनुभवत होतो. त्या फोन कॉलनंतर मी किरणला डेट करण्यास सुरुवात केली. आम्ही 1-2 वर्षे एकमेकांना डेट केले आणि याकाळात आम्ही एकत्रदेखील राहिलो. याकाळात मला कळले की, मी तिच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. तिच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती एक कणखर स्त्री आहे. मग आम्ही आमच्या नात्याला नाव दिले आणि लग्न केले.'

2005 मध्ये आमिर आणि किरणचे मुंबईत लग्न झाले. लग्नानंतर मुंबईच्या पाचगणी येथे 3 दिवस सेलिब्रेशन झाले होते. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन 'महेरबाई हाऊस' नावाच्या जुन्या पारशी बंगल्यात आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. आमिर आणि किरण यांचा एक मुलगा असून त्याचे नाव आझाद आहे. आझादचा जन्म सरोगसीद्वारे झाला. किरणला गर्भधारणेत अडचण आल्यामुळे त्यांनी सरोगसीचा निर्णय घेतला होता. 2011 मध्ये आझादचा जन्म झाला.

बातम्या आणखी आहेत...