आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजूनही आम्ही एकत्रच:घटस्फोटानंतर प्रथमच एकत्र आले आमिर आणि किरण, चैतन्य अक्किनेनी सोबत लडाखमध्ये करत आहेत शूटिंग

लडाखएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाणी फाउंडेशन आमचा मुलगा आझाद सारखे

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री किरण राव घटस्फोटानंतर प्रथमच एकत्र दिसले आहे. आमिर खान आगामी चित्रपट 'लाल सिंह चद्धा'ची लडाखमध्ये शूटिंग करत आहे. घटस्फोटानंतर आमिर आणि किरण प्रथमच एका फोटोत दिसले आहेत. ज्यामध्ये दोघेही खूप खुश दिसत आहे. चैतन्य अक्किनेनीने आपला इंस्टाग्राम अकाउंट वरून हा फोटो शेअर करत त्याला 'ग्रेटफूल' असे कॅप्शन दिले आहे.

पाणी फाउंडेशन आमचा मुलगा आझाद सारखे
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री किरण राव यांनी आपल्या चाहत्यांसाठी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ मॅसेज शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी आपल्या घटस्फोटाची माहिती दिली होती. दरम्यान आमिर खान म्हणाले होता की, आम्ही असे जरी वेगळे झालो असलो तरी आमचा परिवार एकत्रच आहे. या वेळी पाणी फाउंडेशन हे आमचा मुलगा आझाद सारखे असल्याचे वर्णन त्यांनी केले होते.

बॉलिवूडचे पावरफूल कपल्स होते आमिर आणि किरण
अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री किरण राव हे बॉलिवूडचे पॉवरफुल कपल्स मानले जातात. आमिर खान ने 2005 मध्ये रिना दत्ता यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर किरण राव यांच्या सोबत लग्न केले होते. त्या दोघांना एक मुलगा असून त्याच नाव आझाद आहे तो आता दहा वर्षाचा आहे. बॉलीवूड मधील ही सर्वात पावरफुल जोडी असून त्यांनी आता घटस्फोट घेतला आहे. परंतु, या घटस्फोटामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...